आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२३: दिवसभर आनंदित राहाल, प्रत्येक काम सहजपणे पार पडेल!

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2023-08-29 07:41:262023-08-29 07:44:40 | Updated: 2023-08-29 07:44:40

कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमचं राशीभविष्य

Open in app

मेष- आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. आणखी वाचा

वृषभ- आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखाद्या रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल.  आणखी वाचा

मिथुन- आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. आज नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. आणखी वाचा

कर्क- आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. प्रणयक्रिडेत यशस्वी व्हाल. आणखी वाचा

सिंह- आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. आणखी वाचा

कन्या- आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. आणखी वाचा

तूळ- आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्‍या विचार तरंगांमुळे त्रास होईल. आई व स्त्री विषयक चिंता सतावेल. आणखी वाचा

वृश्चिक- आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकार्‍यांकडून सौख्य व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. आणखी वाचा

धनु- आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड होईल. मन दुःखी राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा

मकर- आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा

कुंभ-  आर्थिक व्यवहार तसेच जमीन - जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा

मीन- मित्रांकडून आपणाला लाभ होईल व त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र व वडीलधार्‍यांशी संपर्क साधू शकाल. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट
Open in App