आजचे राशीभविष्य, ०१ डिसेंबर २०२३ : नोकरीत वरिष्ठ खुश होतील, मित्रांकडूनही गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2023-12-01 07:04:502023-12-01 07:20:37 | Updated: 2023-12-01 07:20:37

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Open in app

मेष- आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजची सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार - व्यवसायात लाभ होतील. आणखी वाचा

वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी आहे. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा

मिथुन-  आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. आज आप्तेष्टांचा सहवास आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ होईल. आणखी वाचा

कर्क- आजचा दिवस प्राप्तीच्या प्रमाणात अधिक खर्च करण्याचा आहे. नेत्र विकार बळावतील. मानसिक चिंता वाढतील. कोणाशी वाद होऊ नयेत म्हणून आपल्या कृतींवर संयम ठेवा. आणखी वाचा

सिंह- आजची सकाळची वेळ फारच चांगली आहे. सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक बातम्या प्राप्त होतील. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. आणखी वाचा

कन्या - आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. कुटुंबियांशी सलोखा राहील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. त्यामुळे आपण आनंददित व्हाल. आणखी वाचा

तूळ-  आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज सकाळी आपले मन चिंतातुर होईल. शारीरिक दृष्टया शैथिल्य व आळस वाढेल. नोकरीत वरिष्ठ नाराज होतील. संततीशी मतभेद संभवतात.  आणखी वाचा

वृश्चिक- आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. हातून एखादे अवैध कार्य होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. आणखी वाचा

धनु- आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. सकाळी मनोरंजनात्मक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा

मकर- आज आपणास आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. सामाजिक मान- सन्मान संभवतात. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा

कुंभ-  आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज आपल्यात कले विषयी विशेष गोडी निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. आणखी वाचा

मीन- आज आपण अती भावनाशील व्हाल. अती विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. सबब जमीन, घर, संपत्ती इ. विषयी चर्चा टाळणे हितावह राहील. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App