मेष - आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातम्या मिळून काही लाभ सुद्धा होईल. आणखी वाचा
मिथुन- आज वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शक्यतो वाद - विवाद व बौद्धिक चर्चे पासून दूर राहावे. मानहानी संभवते. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कर्क- आज ग्लानीमुळे आपले मन दुःखी राहील. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद यांचा अभाव दिसून येईल. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल व कामात अपयश येईल. भोजन वेळेवर मिळणार नाही. आणखी वाचा
सिंह- आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. आणखी वाचा
कन्या - आज कुटुंबातआनंदाचे वातावरण राहील. इतरांशी गोड बोलून आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे कोणाशी बौद्धिक चर्चा करणे टाळावे. आणखी वाचा
तूळ- आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. आणखी वाचा
वृश्चिक- आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. एखाद्याशी वाद सुद्धा संभवतात. आपल्या वक्तव्याने गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
धनु- आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा
मकर- आज व्यावसायिक कामात आपणाला लाभ होईल. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आपणास आनंद होईल. आणखी वाचा
कुंभ- आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी असल्याने काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आणखी वाचा
मीन- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मानसिक व शारीरिक कष्ट अधिक होतील. अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाला जुनी येणी वसूल होतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा