मेष- 23 फेब्रुवारी, 2024 शुक्रवारी आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज आपला स्वभाव हळवा झाल्याने कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारामुळे आपल्या भावना दुखावतील. आईच्या प्रकृतीमुळे आपण खूप चिंतित व्हाल. आपला स्वाभिमान सुद्धा दुखावला जाऊ शकतो. आपणाला थकवा जाणवेल, जेवण व झोप ह्यात अनियमितता येईल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहा. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. आणखी वाचा
वृषभ- आज चिंता कमी झाल्याने हायसे वाटेल. आज आपण भावुक व संवेदनशील झाल्याने कल्पनाशक्ती व सृजनशक्ती डोके वर काढतील. साहित्य लेखन किंवा कला क्षेत्र ह्यात आज आपण काम करू शकाल. कुटुंबियांशी विशेषतः मातेशी सुसंवाद घडेल. छोटा प्रवास संभवतो. आर्थिक गोष्टींकडे लक्ष देऊ शकाल. आणखी वाचा
मिथुन- आज सुरवातीच्या त्रासा नंतर आपण ठरवलेली कामे पार पडतील व त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे आपले कीती तरी त्रास कमी होऊ लागतील. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्याने तेथील वातावरण चांगले राहील. मित्र किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदात भर पडेल. आणखी वाचा
कर्क- आजचा दिवस मित्र परिवार व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात चांगला जाईल. त्यांच्या कडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला जाऊ शकाल. तसेच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकाल. काही शुभ समाचार व आर्थिक लाभ सुद्धा मिळतील. पत्नीच्या सहवासात वेळ चांगला जाईल. आणखी वाचा
सिंह- आज आपण कोर्ट - कचेरी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मन चिंतातुर व बेचैन असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपले बोलणे व वर्तन ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे अन्यथा कोणाशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. आपण आज हळवे व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो. आणखी वाचा
कन्या- आजचा दिवस आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. वाडवडील व मित्र यांच्या सहवासात आपला दिवस आनंदात जाईल. प्रवास सुद्धा संभवतो. पत्नी व संतती ह्यांच्यासह वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. संतती कडून सुखद बातम्या समजतील. आणखी वाचा
तूळ- आज आपले घर व कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरी करणार्यांना बढतीची शक्यता आहे. वरिष्ठ आज आपल्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. आणखी वाचा
वृश्चिक- आज शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास होईल. वरिष्ठ आज आपल्या कामगिरीवर नाखूष होतील. संततीशी मतभेद संभवतात. आणखी वाचा
धनु- आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. एखादी शस्त्रक्रिया संभवते. आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा. अचानकपणे एखादा आजार सतावेल. खर्चात वाढ होईल. आणखी वाचा
मकर- आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायी आहे. व्यापारवृद्धी होईल. ह्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी पैसा मिळून धन भांडारात वाढ होईल. प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. आणखी वाचा
कुंभ- आजचा दिवस कामात यश मिळविण्यासाठी अनुकूल आहे. केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. तन मनाला उत्साह जाणवेल. नोकरी - व्यवसायात अपेक्षित सहकार्य लाभेल. मातुल घरा कडून चांगली बातमी कळेल. खर्च वाढेल. आणखी वाचा
मीन- आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूलतेचा आहे. अभ्यासात यश व प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्य क्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल. प्रेमीजनांना परस्परांचा सहवास लाभेल. आपल्या स्वभावात जास्त हळवेपणा राहील. आणखी वाचा