आजचे राशीभविष्य : आज नशिबाची साथ लाभेल, हितशत्रूंवर मात करू शकाल

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2023-10-21 07:28:452023-10-21 07:38:51 | Updated: 2023-10-21 07:38:51

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app


मेष - आज आपणाला थकवा, आळस व व्यग्रता जाणवेल. उत्साह अजिबात वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीचा राग आल्याने आपली कामे बिघडतील. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात आपल्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही, ह्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

वृषभ - आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. अशा परिस्थितीत नवीन कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. शक्यतो प्रवास टाळावेत. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस मनोरंजन व आनंद - प्रमाद करण्याचा आहे. मित्र व कुटुंबीयांसह आनंदी वातावरणात दिवस घालवाल. सामाजिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस आनंददायी व यशदायी आहे. महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा 

सिंह - आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल. मित्रांचा सहवास आनंद देईल. हातून एखादे परोपकाराचे कार्य घडेल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. अतिरिक्त पैसा खर्च होईल. आणखी वाचा

तूळ - आज नशिबाची साथ लाभेल. भावंडांशी सौहार्दतेचे संबंध राहतील. एखाद्या प्रवासाचे नियोजन कराल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. हितशत्रूंवर मात करू शकाल. सन्मान प्राप्ती होईल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. वाणी संयमित ठेवल्यास कुटुंबात सुख - शांति नांदू शकेल. एखाद्या मांगलिक कामासाठी खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे. आणखी वाचा

धनु - आज शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नियोजित कामे करु शकाल. आर्थिक फायदा होईल. प्रवास संभवतात. नातेवाइकां कडील एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. आजचा आपला व्यवहार सामान्य राहील. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल व त्यात खर्चही होऊ शकतो. आरोग्य विषयक चिंता राहील. आणखी वाचा

कुंभ - नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात फायदा संभवतो. एखाद्या स्त्रीमुळे आपली कामे होतील. आज मोठे आर्थिक लाभ होतील. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामे यशस्वीपणे होऊ शकतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने आपला दिवस आनंदात जाईल. व्यापार वृद्धी होईल. वडील व वडिलधाऱयां कडून फायदा होईल. एखादा मोठा आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App