मेष - आज चंद्र 13 मार्च, 2024 बुधवारी मेष राशीत आहे. आज आपले प्रत्येक काम उत्साह व आवेश यांनी पूर्णतः भरलेले असल्याचा अनुभव आपणास येईल. मित्र व स्नेही यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. आई कडून लाभ होईल. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ, रुचकर भोजन व भेटवस्तू मिळाल्याने आपला आनंद वाढेल. आणखी वाचा
वृषभ - आज घर - परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. गैरसमजा पासून जपून राहावे. आणखी वाचा
मिथुन - आज कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी - व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. वाहेच्छुकांचे विवाह ठरतील. स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कर्क - आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आई तसेच इतर कुटुंबीय ह्यांच्याशी सौहार्दाचे संबंध राहतील. आणखी वाचा
सिंह - आज आळस, थकवा व ऊबग आपल्या कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारी मुळे अस्वस्थता अनुभवाल. नोकरी - व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळे प्रगतीत अडथळा येईल. वरिष्ठांशी मतभेद होतील. आणखी वाचा
कन्या - आज 'मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका. जलाशया पासून दूर राहा. खर्च खूप होईल. गूढ विद्या व रहस्य ह्यांची गोडी लागेल. आणखी वाचा
तूळ - आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नालिंगी किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आपणास खूप आनंद होईल. आणखी वाचा
वृश्चिक - कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य व उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच गुप्त शत्रू ह्यांच्यावर आपण मात करू शकाल. मित्र - मैत्रिणींचा सहवास तसेच प्रणयालापामुळे आपला आनंद व्दिगुणित होईल. आणखी वाचा
धनु - आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील व त्यामुळे संताप वाढेल. पोटाच्या तक्रारीने हैराण व्हाल. वाद - विवाद किंवा चर्चा यामुळे समस्या निर्माण होईल. संततीची काळजी वाटेल. धनप्राप्ती होईल. आणखी वाचा
मकर - आज उत्साह व स्फूर्ती ह्यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन खिन्न होईल. स्त्रीवर्गा कडून काही नुकसान होईल किंवा काही कारणाने त्यांच्याशी मतभेद होतील. आणखी वाचा
कुंभ - आज आपणास चिंतामुक्त झाल्याने जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. दांपत्य जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आर्थिक लाभ व सामाजिक मान - प्रतिष्ठा मिळेल. आणखी वाचा
मीन - आज आपणास बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. रागामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. विशेषतः डोळ्यांकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीय व प्रियजन ह्यांच्याशी मतभेद संभवतात. एकंदरीत आजचा दिवस विचार पूर्वक वागण्याचा आहे. आणखी वाचा