आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2024-05-29 07:41:132024-05-29 07:52:06 | Updated: 2024-05-29 07:52:06

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app


मेष - आज घर, कुटुंब व संतती यांच्या संबंधी आपणाला आनंद व संतोषाची भावना राहील. आज आप्तेष्ट व मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास होऊन त्यात लाभ होईल. व्यवसायात लाभ, मान व प्रतिष्ठा मिळेल. आणखी वाचा

वृषभ -  आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्या कडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्‍या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. आणखी वाचा

मिथुन - आज कोणत्याही प्रकारच्या संकटा पासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. आणखी वाचा

कर्क -  आज नवी वस्त्रे व अलंकार ह्यांची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात मान मिळेल. व्यावसायिक भागीदारीत लाभ होईल. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील. प्रेमिकांना प्रणयात सफलता प्राप्त होईल. आणखी वाचा 

सिंह - आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. व्याधीमुक्त व्हाल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. आणखी वाचा

तूळ - माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नसल्याने प्रवास टाळा. छातीदुखीचा त्रास जाणवेल. जमीन विषयक व्यवहार अतिशय जपून करा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. आणखी वाचा

वृश्चिक -  घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय व मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात करू शकाल. आपली लोकप्रियता वाढेल. आणखी वाचा

धनु - कुटुंबियांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. नाहक खर्च व अकारण व्यवहार मनाला व्यथित करतील. आणखी वाचा

मकर - प्रकृती उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र, स्नेही ह्यांच्या सहवासाने एकदम खुश व्हाल. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. वस्त्र, आभूषणे मिळतील. वैवाहिक जीवनात सुख व समाधान लाभेल. आणखी वाचा

कुंभ -  आज खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा. दुर्घटनेपासून जपा. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल. मित्रांसह सहलीचे बेत आखाल. पत्नी व संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App