मेष - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. बाहेरचे खाणे - पिणे टाळणे हितावह राहील. आणखी वाचा
वृषभ - आज उत्साह व चौकसवृत्ती ह्यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात सहभागी व्हाल. कामात सहजपणे एकाग्रचित्त होऊ शकेल. धनलाभ होऊन आर्थिक नियोजन सुद्धा यशस्वीपणे करू शकाल. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस कष्टदायी असल्याने प्रत्येक काम सावधपणे करावे लागेल. कुटुंबीय व संततीशी मतभेद संभवतात. आवेश व संतापावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत. शरीर प्रकृती बिघडेल. डोळ्यांचा त्रास जाणवेल. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. रमणीय स्थळी सहलीचे बेत आखाल. आणखी वाचा
सिंह - आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणावर खूष होतील. दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल. वडिलांशी सौहार्दाचे संबंध राहतील व त्यांच्या कडून लाभ सुद्धा होईल. आणखी वाचा
कन्या - आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल. थकवा व अशक्तपणामुळे कामे धीम्या गतीने होतील. नोकरी - व्यवसायात सहकारी व अधिकारी नाराज होतील. आणखी वाचा
तूळ - आज शक्यतो वाद टाळणे हितावह राहील. रागावू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवणे हितावह ठरेल. हितशत्रूं पासून सावध राहावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अचानक धनलाभ संभवतो. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसह मौजमजा, मेजवानी इत्यादीत आजचा दिवस घालवाल. उत्तम वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल. मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. आणखी वाचा
मकर - निर्णयाच्या अभावामुळे मन चिंताक्रांत राहील. तब्बेतीच्या बाबतीतही चिंता राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या आरोग्याची काळजी राहील. आणखी वाचा
कुंभ - आज मन संवेदनशील राहील्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्ती होईल. आज ठरवलेली सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. स्त्रीयांना सौंदर्य प्रसाधनांवर खर्च करावा लागेल. आणखी वाचा
मीन - महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अनुकूल आहे. सृजनशक्ती वाढेल. वैचारिक खंबीरपणा व मानसिक स्थैर्य ह्यामुळे कामात सहज यश मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. आणखी वाचा