आजचे राशीभविष्य - १३ जुलै २०२२; आजचा दिवस सावध राहण्याचा, वाद होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2022-07-13 07:25:502022-07-13 07:35:14 | Updated: 2022-07-13 07:35:14

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष -  आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. सरकार विरोधी कृत्यां पासून शक्यतो दूर राहा. एखादा अपघात संभवतो. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा

वृषभ - आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. मित्र व स्वकीयांसह हिंडण्या - फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे व स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. आणखी वाचा

मिथुन - आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस भरपूर मनोरंजन करून आनंदात घालविण्याचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आणखी वाचा

कर्क - आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. परंतु दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. प्रकृती सुधारेल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा

सिंह -  आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता असल्यामुळे आपणास संयमित राहावे लागेल. धन व कीर्ती यांची हानी संभवते. आणखी वाचा

कन्या -  आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण गूढ विद्येकडे आकर्षित व्हाल. आर्थिक लाभ संभवतात. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करायला अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. विरोधकांवर मात करू शकाल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आणखी वाचा

तूळ - आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज सकाळच्या प्रहरी प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबियांशी प्रेमाने वागावे लागेल. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृश्चिक - आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांच्या सहवासाचा आनंद घ्या. दुपार नंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील. आणखी वाचा

धनु - आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे आज आपली वाणी व संताप ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. आज शक्यतो शस्त्रक्रिये सारख्या बाबी टाळणे हितावह राहील. दुपार नंतर कामे यशस्वी होतील. आणखी वाचा

मकर - आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. पत्नी व संतती ह्यांच्याकडून काही फायदा संभवतो. कौटुंबिक जीवनात घडणाऱ्या काही सुखद प्रसंगामुळे आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा

कुंभ - आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल. सामाजिक मान - सन्मान होतील. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. स्वास्थ्य ठीक राहील. व्यापारातील येणे वसूल होईल. आणखी वाचा

मीन -  आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास संभवतात. परदेशातील मित्र किंवा स्वकियांशी संपर्क साधू शकाल. आज आपणास उत्साह व थकवा दोन्हीही जाणवतील. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App