मेष - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदी व प्रसन्न व्हाल. आर्थिक लाभ सुद्धा होईल. मित्र व सगे सोयरे ह्यांच्या भेटीने घरातील वातावरण आनंदी होईल. उत्तम कपडे व भोजन प्राप्ती होईल. आणखी वाचा
वृषभ - आज सावध राहावे लागेल. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. स्नेही व कुटुंबीय ह्यांच्याशी मतभेद झाल्याने आपण दुःखी व्हाल. आपण सुरू केलेले काम अपूर्ण राहील. खर्च वाढेल. आणखी वाचा
मिथुन - आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास वाढेल. पत्नी व संतती कडून फायदेशीर बातमी मिळेल. मित्रांशी संवाद साधल्याने आनंद मिळेल. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. बढतीची हमखास शक्यता आहे. कुटुंबात महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. आईची तब्बेत उत्तम राहील. धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती होईल. घराच्या सजावटीत फेरबदल कराल. आणखी वाचा
सिंह - आज मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. सर्व व्यवहार न्यायानुसार असेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात अडचणी येतील व वरिष्ठ नाराज झाल्याने तुम्हाला दुःख होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कन्या - आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आज आपला आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. स्नेही व कुटुंबीयांशी जोराचे वाद झाल्याने आपण दुःखी व्हाल. आणखी वाचा
तूळ - आज आपले मन मित्रांसह खाणे - पिणे, फिरावयास जाणे तसेच प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी राहील. एखादी सहल संभवते. मनोरंजनाची साधने व वस्त्रालंकार यांची खरेदी होईल. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस सौख्यदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता अनुभवाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. स्त्रीयांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल. धनलाभ होईल. आणखी वाचा
धनु - आज आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता आहे. वाड्मय किंवा अन्य सृजनशील कलेप्रती आस्था राहील. आणखी वाचा
मकर - आज आपणास प्रतिकूलतेस तोंड द्यावे लागेल. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची प्रकृती मनात चिंता उत्पन्न करेल. सार्वजनिक जीवनात अपयश, अपकीर्ती होईल किंवा मान - प्रतिष्ठेची हानी होईल. पुरेशी विश्रांती व झोप न मिळाल्याने आरोग्य बिघडेल. आणखी वाचा
कुंभ - आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी व भावंडांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. स्नेहीजन घरी आल्याने आनंद वाटेल. आणखी वाचा
मीन - आज खर्च, संताप व जीभ यावर संयम ठेवावा लागेल. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार व पैश्यांच्या देवाण - घेवाणीत सावध राहावे. कुटुंबियांशी भांडण होईल. नकारात्मक विचार मनावर छाप पाडतील. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा