आजचे राशीभविष्य - १ ऑक्टोबर २०२३, नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2023-10-01 07:36:042023-10-01 07:37:18 | Updated: 2023-10-01 07:37:18

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष -  आजचा दिवस आनंदोस्तव साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदाचे असेल. स्त्रीयांना माहेरहून काही लाभ होऊन एखादी चांगली बातमी मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.  आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपणास विविध चिंता सतावतील. प्रकृतीची साथ मिळणार नाही. स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्याने घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील. काही कारणास्तव खर्च वाढेल. केलेल्या कष्टाचे फळ असमाधानकारक असेल.  आणखी वाचा 

मिथुन  -  आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

कर्क  - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापारी वर्गास लाभ होईल. नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील. नवीन सजावट करून घराची शोभा वृद्धिंगत कराल. आई कडून लाभ होईल.  आणखी वाचा 

सिंह - आजचा दिवस आळस व थकवा ह्यात जाईल. आपल्या तापॅट स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. नकारात्मक विचार, वर्तन व नियोजन ह्या पासून दूर राहावे.  आणखी वाचा 

कन्या -   आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. अती उत्साह व क्रोधाचे प्रमाण वाढल्याने आरोग्यावर ताण येण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. एखादा प्रवास संभवतो.  आणखी वाचा 

तूळ - आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्‍या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसह बाहेर जावे लागेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापारी वर्गाला व्यापारात वाढ होईल.  आणखी वाचा 

वृश्चिक -  आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या भेटी रद्द झाल्याने निराश व क्रोधीत व्हाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. मातुला कडून एखादी अप्रिय बातमी मिळाल्याने मन व्यथित होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात.  आणखी वाचा 

धनु -   आज कार्यपूर्ती न झाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतती विषयक बाबींमुळे चिंता वाढतील. शक्यतो आज प्रवास टाळावेत. आणखी वाचा 

मकर -  आज आपली मनःस्थिती व आरोग्य चांगले राहणार नाही. कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. छाती संबंधी आजार होऊ शकतो. झोप येणार नाही. मानहानी होऊ शकते.  आणखी वाचा 

कुंभ - आज आपणास मनाने हलके वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांसह काही आयोजन कराल. त्यांच्यासह वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. जवळच्या ठिकाणी सहलीसाठी जाऊ शकाल.  आणखी वाचा   

मीन -  आज आपणास खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागावर व वाणीवर सुद्धा ताबा ठेवावा लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार सावधपणे करावे लागतील. शारीरिक व मानसिक आरोग्य मध्यम राहील. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App