मेष - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यास आपण खूप उत्साहीत असाल. शारीरिक व मानसिक आरोग्य हा उत्साह द्विगुणित करेल. आणखी वाचा
वृषभ - द्विधा मनःस्थितीमुळे आपण असमाधानी राहाल. सर्दी, कफ, खोकला, ताप ह्यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यसाठी खर्च होईल. स्वकीयांशी दुरावा संभवतो. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. आणखी वाचा
मिथुन - आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवाचे व सहलीचे नियोजन करू शकाल. आणखी वाचा
कर्क - आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. आणखी वाचा
सिंह - आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक व मानसिक आरोग्य नरम गरमच राहील. आपला संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी होईल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात व प्रवासात अडचणी येतील. आज कोणत्याही बाबतीत लाभ, लोभ, द्वेष, प्रेम व तिरस्कार इत्यादी भावना मनात न ठेवता सम भावना बाळगल्यास आपली कामे होऊ शकतील. आणखी वाचा
तूळ - आजच्या दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. एखाद्या प्रवासामुळे काही आर्थिक लाभ संभवतो. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस बौद्धिक कार्य, जनसंपर्क व इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने चांगला आहे. जवळचा प्रवास संभवतो. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आणखी वाचा
धनु - आज शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कठोर परिश्रमा नंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. आणखी वाचा
मकर - आज आपण फारच भावनाशील व्हाल. आपल्या भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा. कोणत्याही गोष्टीत घाईने निर्णय घेऊ नका. आणखी वाचा
कुंभ - आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल नाही. मात्र, नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. दुपार नंतर मानसिक व्यग्रता वाढेल. आणखी वाचा
मीन - आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन होईल. मतभेद व तणाव निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबीत सावध राहा. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. आणखी वाचा