हा महिना आपल्यासाठी चढ - उतारांनी भरलेला आहे. आपल्या व्यवसायात आपणास उत्तम यश मिळून मोठा लाभ सुद्धा होऊ शकतो. शासकीय कामातून सुद्धा आपणास चांगला लाभ होऊ शकतो. जमीन - जुमल्याशी संबंधित कामात आपण यशस्वी होऊ शकता. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कार्यालयात काही नवीन लोक आली असून आपली वाढत चाललेली प्रगती बघून आपल्या विरुद्ध एखादे षडयंत्र रचण्याची शक्यता असल्याने आपणास थोडे सावध राहावे लागेल. आपल्या खर्चात वाढ झाली तरी प्राप्तीत सुद्धा वाढ झाल्याने काळजी करावी लागणार नाही. कौटुंबिक वातावरण सुद्धा उत्तम असेल. आपल्या प्रणयी जीवनात रोमांस वाढून आपण दूरवरचे प्रवास सुद्धा करू शकाल. ह्या दरम्यान आपल्यातील जवळीक वाढेल. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतील. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारा जवळ आपले मन मोकळे कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे नुकसानदायी होऊ शकते. विद्यार्थ्यांना अध्ययनात यश प्राप्ती होईल. महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.