राशी भविष्य

मीन

हा महिना आपणास अनुकूल असण्याची संभावना आहे. आपल्या योजना यशस्वी होतील. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. एखादी पैतृक किंवा जुनी वारसागत प्रॉपर्टी आपणास मिळू शकते. आपण कौटुंबिक बाबतीत काहीसे व्यस्त राहाल. विवाहित व्यक्ती कौटुंबिक समस्यांशी झगडत राहतील. आपण घर खर्चावर सुद्धा लक्ष द्याल व कौटुंबिक जीवनासाठी खूप सारी खरेदी कराल, ज्यात अतिरिक्त पैसा खर्च होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेचा व अनुभवाचा फायदा होईल. व्यावसायिकांसाठी महिना चढ - उतारांचा आहे. कोणताही मोठा निर्णय घेणे त्यांनी सध्या टाळावे. व्यावसायिक भागीदारांशी गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम बघावयास मिळतील. त्यांची मेहनत यशस्वी होईल. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.