राशी भविष्य

मेष

हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी असण्याची संभावना आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल असा एखादा अचानक धनलाभ आपणास आठवड्याच्या सुरवातीसच होऊ शकतो. कारकिर्द व व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊन आपली प्रगती उंचावेल. महिलांची धर्म - कर्म प्रति रुची वाढून त्यांचे समाधान होईल. व्यवसायात आपणास आशास्पद प्रगती होत असल्याचे दिसेल. असे असले तरी आर्थिक देवाण - घेवाण करताना आपणास सतर्क राहावे लागेल. तसेच इतरांवर नजर ठेवावी लागेल. आठवड्याच्या अखेर पर्यंत आपणास एखाद्या धार्मिक किंवा मांगलिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्याने आपण आनंदित व्हाल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या प्रेमिकेवरील प्रेमात व सामंजस्यात सुधारणा होईल. दांपत्य जीवन सुखद होईल. आरोग्याच्या बाबतीत आठवडा सामान्य असला तरी आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मुलांशी संबंधित एखाद्या समस्येचे निराकरण झाल्याने आपण संतुष्ट व्हाल.