हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस काही कामात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आपले मन खिन्न होण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात एखादी दुखापत किंवा त्दुर्घटना होण्याची संभावना असल्याने आपणास वाहन सावधपणे चालवावे लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या प्राप्तीच्या साधनांवर गदा येऊ शकते. व्यापाऱ्यांना त्यांच्या स्पर्धकांना कडवी झुंज द्यावी लागू शकते. आठवड्याच्या मध्यास कामे वाढतील. महिलांना कार्यालय व घर ह्यात समतोल साधणे अवघड होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी आपणास जोडीदारासाठी थोडा वेळ काढावा लागेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा विशेष अनुकूल नाही. आपल्या प्रेमाचे प्रदर्शन मांडू नये, तसेच ते जगजाहीर सुद्धा करू नये. आपल्याला कोणतेही पाऊल विचारपूर्वकच उचलावे लागेल, अन्यथा आपणास समस्यांचा सामना करावा लागू शकतो.