हा आठवडा आपल्यासाठी शुभ व लाभदायी आहे. आपल्या कारकिर्दीत व व्यवसायात प्रगती होण्याची संभावना आहे. आपणास इतरांचे सहकार्य मिळाल्याने आपण आपले लक्ष्यांक गाठू शकाल. आठवड्याच्या अखेर पर्यंत आपणास चांगली बातमी मिळण्याची संभावना असून त्यामुळे घरात आनंद पसरेल. व्यवसाया निमित्त केलेले प्रवास आपली धनवृद्धी व व्यवसायवृद्धी करण्यास मदतरूप होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त प्राप्तीचे स्रोत मिळून त्यांच्या संचित धनाची वाढ होऊ शकते. हा आठवडा नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सुद्धा शुभ फलदायी आहे. कार्यक्षेत्री त्यांच्या मान - सन्मानात वाढ होईल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रकृती सामान्यच राहील. कुटुंबात एखादे मंगल कार्य संपन्न होऊ शकते, जे सुखद व शुभ असेल. ह्या आठवड्यात आपणास खूप सुख व समृद्धी प्राप्त होईल.