राशी भविष्य

मेष

या वर्षाची सुरवात आपल्यासाठी अनुकूल होण्याची संभावना आहे. या वर्षी कुटुंबातील एखाद्याचा विवाह होऊ शकतो. जे संतती प्राप्तीस इच्छुक आहेत, त्यांची हि इच्छा या वर्षी पूर्ण होऊ शकते. प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरवात अनुकूल आहे. आपण प्रेमिकेशी उत्तम समन्वय साधू शकाल. या संपूर्ण वर्षात आपले संबंध सुधारण्यावर आपणास लक्ष द्यावे लागेल. वैवाहिक जीवन सुखावह होईल. आपणास वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्याच्या संधी मिळतील. आपसातील समन्वय चांगला असेल. एकमेकांपासून लाभ सुद्धा होईल. वर्षाच्या सुरवातीला कौटुंबिक तणाव वाढू शकतो. या वर्षात आपल्या खर्चात वाढ होतील, ज्याचा परिणाम आपल्या खिश्यावर होत असल्याचे दिसून येईल. आर्थिक स्थितीत चढ - उतार होत असल्याचे दिसले तरी आपण चांगली अर्थ प्राप्ती करण्यात यशस्वी व्हाल. एकाहून अधिक कामातून धन प्राप्तीचे मार्ग आपणास दिसू लागतील. या वर्षात आपण एखादी मोठी प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करू शकता, त्यामुळे आपणास चांगला लाभ सुद्धा होईल. आपल्या गोड बोलण्याने इतरांकडून आपले काम करवून घेण्यात आपण यशस्वी व्हाल. कारकिर्दीसाठी हे वर्ष चांगले आहे. व्यवसायात सुद्धा चांगला पाठिंबा मिळेल. व्यावसायिक भागीदाराशी जवळीक वाढेल. व्यापारात चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना या वर्षी वरच्या पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. तसेच पगारवाढ सुद्धा होऊ शकते. या वर्षी कार्यक्षेत्री काही लोक आपल्यासाठी समस्या निर्माण करू शकतात, त्या बद्धल सतर्क राहावे. या वर्षात तीर्थयात्रा करण्याची मोठी संधी मिळेल. दूरवरच्या प्रवासात आपणास मान - सन्मान प्राप्त होऊन आपली सामाजिक प्रतिमा उंचावेल. आई - वडिलांची प्रकृती आपणास त्रस्त करू शकते. असे असले तरी वर्षाच्या मध्यास परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. या वर्षात आपणास प्राप्ती सुद्धा चांगली होईल. कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. स्वतःवर विश्वास ठेवल्याने आपली सर्व कामे होऊ लागतील. इतरांना सुद्धा मदत करा. या वर्षात एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज काढण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. या वर्षात विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे आले तरी सुद्धा ते परीक्षेत यशस्वी होतील. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. हे वर्ष उच्च शिक्षणासाठी चांगले आहे. या वर्षात आपली एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. या वर्षात आपण आजारी पडण्याची शक्यता असल्याने आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. संतती कडून सुख मिळेल. या वर्षात परदेशी जाण्याची आपली इच्छा पूर्ण होऊ शकते.