राशी भविष्य

कर्कन

आपण अत्यंत भावनाप्रधान असता. आपण कुटुंबियांसह राहण्यास जास्त प्राधान्य देता. ह्या वर्षी भावनेच्या आहारी न जाता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणे आपल्यासाठी फायदेशीर होऊ शकते. वर्षाच्या सुरवातीसच आपण अर्थप्राप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. कौटुंबिक गोष्टींवर सुद्धा आपले लक्ष राहील. कुटुंबियांच्या पाठबळामुळे आपण काही मोठे निर्णय घ्याल. आपण जर वडिलोपार्जित किंवा कुटुंबाच्या अनेक वर्षांपासून चालत आलेला व्यवसाय करत असाल तर ह्या वर्षी व्यवसायात आपणास मोठा लाभ होईल. आपली आर्थिक स्थिती उंचावू शकेल. परदेशवारी संभवते. आपण जर लष्कर, वायुदल किंवा पोलिसात नोकरी करण्यास इच्छुक असाल व त्यासाठी स्पर्धा परीक्षा देणार असाल तर ह्या वर्षी यशस्वी होण्याची संभावना असल्याचे दिसत आहे. कौटुंबिक जीवन सुखद होईल. कुटुंबीय मदत करतील. मातेशी विशेष प्रेम राहील. मातेकडून काही चांगल्या कामाची शिकवण सुद्धा मिळेल. तिच्या कडून आपणास मार्गदर्शन मिळेल व त्यामुळे एखादी नवीन संधी सुद्धा आपणास मिळू शकते. वडिलांशी सुद्धा आपले संबंध उत्तम राहतील, परंतु त्यांच्या प्रकृतीत चढ - उतार होत असल्याचे दिसू शकते. वडिलांशी आपले मतभेद सुद्धा संभवतात, तेव्हा त्यांच्याशी उत्तम संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा व त्यांची काळजी घ्या. आपण जर रिअल इस्टेटशी संबंधित असलात तर जमीन - जुमल्याची काही महत्वाचे दस्तावेज आपणास काळजीपूर्वक जपून ठेवावे लागतील. एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करावयाची असल्यास ह्या वर्षी एखाद्या वादापासून दूर राहा, अन्यथा कोर्ट - कचेरीचा सामना करावा लागू शकतो. कर्ज काढून प्रॉपर्टी खरेदी करणे आपल्या हिताचे होईल. अशी प्रॉपर्टी आपणास यशस्वी करेल व आपल्यासाठी नशीबवान सुद्धा ठरू शकेल. कोणावरही विचार न करता विश्वास ठेवू नका. भविष्यात कोणत्याही वादास सामोरे जावे लागू नये म्हणून पूर्ण पडताळणी करूनच प्रॉपर्टीच्या दस्तावेजांवर स्वाक्षरी करावी. सासुरवाडी कडील लोकांकडून आपणास खूप चांगल्या उपयुक्त गोष्टी ऐकावयास मिळतील व काही महत्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा ते आपणास खूप मदत करतील. ह्या वर्षी वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने आपणास त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. संततीशी संबंधीत सुखद बातमी मिळेल. संततीस सुद्धा सौख्य प्राप्ती होईल.