या वर्षाची सुरवात आपल्यासाठी चांगली आहे. आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या व ज्ञानाच्या जोरावर अनेक कामात यशस्वी होऊ शकाल. वैवाहिक जोवनात आपला जोडीदार आपल्या पाठीशी राहील. आपण त्यांच्यासह नवीन ठिकाणी प्रवासास जाल. तीर्थयात्रेस सुद्धा जाऊ शकता. या वर्षात आपणास जोडीदारा कडून सौख्य प्राप्त झाल्याने आपल्या वैवाहिक जोवनात सुधारणा होईल. प्रेमीजनांना मात्र काहीसे सावध राहावे लागेल. आपल्या प्रेमिकेच्या व्यक्तिगत जीवनात आवश्यकते पेक्षा जास्त हस्तक्षेप करणे आपल्यासाठी नुकसानदायी होईल. तिला आपले वागणे अजिबात आवडणार नाही, परिणामतः ती आपल्या पासून दूर होऊ शकते. आपण जर तिला थोडे समजून घेऊन तिच्याशी संवाद साधला तर ती स्वतःहून आपल्याकडे ओढली जात असल्याचे आपणास दिसून येईल. मग आपल्यातील समन्वय उत्तम प्रकारे साधला जाईल. वर्षाच्या सुरवातीस आपणास रोमांस करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी वर्षाची सुरवात चांगली आहे. आपणास नोकरीची नवीन संधी मिळून आपल्याला चांगली प्राप्ती सुद्धा होऊ शकते. आपण जर शासकीय नोकरीत असाल तर आपली पदोन्नती संभवते, मात्र त्या आधी आपली बदली सुद्धा होऊ शकते. वर्षाच्या सुरवातीस आपणास आपल्या सहकाऱ्यांशी नीट वागावे लागेल, अन्यथा एखादी समस्या निर्माण होऊ शकते. या वर्षात आपल्या व्यवसायाची सुद्धा प्रगती होईल. व्यापारवृद्धी होईल. काही प्रतिष्ठित व्यक्तींकडून आपणास चांगली कामे मिळाल्याने आपला व्यवसाय मोठी उंची गाठू शकेल. या वर्षात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वर्षाच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंत प्रकृतीत चढ-उतार येऊ शकतात. आपण जर आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर एखाद्या मोठ्या समस्येस आपणास सामोरे जावे लागू शकते. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी चांगले आहे. ते आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचा लाभ घेऊ शकतील. अभ्यासात उत्तम कामगिरी होण्यासाठी त्यांना आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करावा लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या वर्षाच्या मध्यास आपणास आपले घर बदलावे लागू शकते. आपला प्रेम विवाह होण्याची संभावना आहे. या वर्षी विवाहेच्छुकांसाठी चांगले विवाह प्रस्ताव सुद्धा येऊ शकतात. आपण जर परदेशात जाऊ इच्छित असाल तर जानेवारी-फेब्रुवारीत आपणास चांगली संधी मिळू शकते. कार्यक्षेत्री कोणाशीही भांडू नये. आपण जर हि गोष्ट लक्षात ठेवलीत तर आपली खूप मोठी प्रगती होऊ शकेल.