आर्मीच्या रणजीत सिंगने जिंकली ठाणे वर्षा मॅरेथॉन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 01:28 PM2017-08-13T13:28:52+5:302017-08-13T15:24:18+5:30

आर्मीच्या रणजीत सिंगने ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये बाजी मारली आहे. त्याने 21 किलोमीटरचे अंतर एक तास आणि दहा मिनिटांमध्ये पार करत पुरुष गटाच्या विजेतेपदावर कब्जा केला.

Army's Ranjeet Singh wins Thane Rain Marathon | आर्मीच्या रणजीत सिंगने जिंकली ठाणे वर्षा मॅरेथॉन

आर्मीच्या रणजीत सिंगने जिंकली ठाणे वर्षा मॅरेथॉन

googlenewsNext

ठाणे, दि. 13 -  आर्मीच्या रणजीत सिंगने ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये बाजी मारली आहे. त्याने 21 किलोमीटरचे अंतर एक तास आणि दहा मिनिटांमध्ये पार करत पुरुष गटाच्या विजेतेपदावर कब्जा केला. या गटात नाशिकच्या पिंटू कुमार यादवने दुसरा आणि अलिबागच्या सुजित गमरे याने तिसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या 15 किमी गटात नाशिकची आरती पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. महिला गटात वर्षा भवानी दुसरी तर ज्योती चव्हाण तिसरी आली. 
आज सकाळी हजारो ठाणेकरांच्या उत्साही प्रतिसादात ठाणे वर्षा मॅरेथॉनला सुरुवात झाली.  ठाणे परिसरातून जाणाऱ्या 21 किलोमीटर लांब पल्याच्या मुख्य स्पर्धेकडे सर्व ठाणेकरांचे लक्ष लागले होते.  त्या शर्यतीत प्रथम येण्याचा मान 1 तास 10 मिनिटात 21 किलोमीटरचे अंतर कापून पुणे आर्मी येथील रणजित सिंग याने मिळवला. तर नाशिक येथील द्वितीय पिंटूकुमार यादव याने पटकावला. सुजित गमरे याने तिसरा क्रमांक पटकावले. तृतीय क्रमांक सुजित याने खारघर येथील यावर्षीच्या मॅरेथॉन मध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला होता . मोठ्या प्रमाणात स्पर्धेत लहान मुले, महिला , जेष्ठ नागरिक यांनी सहभाग घेतला .

या स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे

 

21 किमी (पुरुष गट)

रंजित सिंग (प्रथम), पिंटू यादव (व्दितीय), सचिन गमरे, अलिबाग (तृतीय), तानाजी नलावडे (चतुर्थ), महेश वढाई (पाचवा), शेषराव राऊत, नागपूर (सहावा), रमेश गवळी, नाशिक (सातवा), समिर माळी (आठवा), किरण बिचारे, (नववा), लाकेश कुशरामे (दहावा)

 

15 किमी (महिला गट)

आरती पाटील, भोसले मिलिट्री कॉलेज, नाशिक (प्रथम), वर्षा भवारी, मुंबई पोलिस (व्दितीय), ज्योती चौहाण, संग्राम प्रतिष्ठान पुणे (तृतीय), गीता वाटगुरे, गडचिरोली, (चतुर्थ), रिशु सिंग, भोसले मिलिट्री कॉलेज, नाशिक (पाचवी), प्रियंका भोपी, शिवभक्त विद्या मंदीर, बदलापूर (सहावी), रेखा राणगट्टे, सांगली अ‍ॅमेच्युअर अ‍ॅथलेटिक्स असो. (सातवी), शितल बारई, नऊ महाराष्ट्र क्रीडा मंडळ (आठवी), प्रियंका चवरकर, संग्राम प्रतिष्ठान पुणे (नववी), विनया मालूसरे, संग्राम प्रतिष्ठान पुणे (दहावी)

 

पुरुष गट (सर्वसाधारण) - 10 किमी

ज्ञानेश्वर मोरया, पालघर (प्रथम), अमित माळी, पालघर (व्दितीय), युवराज तेथले, पालघर (तृतीय), काशिनाथ घोरे, पालघर (चतुर्थ), आलेश हडल, पालघर (पाचवा), ऋषिकेश बुधवंत (सहावा), अनिल कोरवी (सातवा), माळी करण, रायगड (आठवा), विरेंद्र काळे (नववा), रामु गणपत पारधी (दहावा).

 

 

18 वर्षाखालील मुले - 10 किमी

प्रकाश देशमुख, वाशि (प्रथम), दिनेश म्हात्रे, वनवासी कल्याण आश्रम (व्दितीय), शिवाजी गोसावी, चंद्रपूर जिल्हा स्टेडीयम (तृतीय), अंकित भोरे, वनवासी कल्याण आश्रम  (चतुर्थ), विकी राऊत, पुणे (पाचवा), सुनिल पवार, पुणे अ‍ॅथलेटिक्स क्लब (सहावा), निलेश आरसेकर, कांदोवली, मुंबई (सातवा), रोहिदास मोरघा, वनवासी कल्याण आश्रम (आठवा), शुभम मारवते, पुणे अ‍ॅथलेटिक्स क्लब (नववा), यश शिवालकर, कांदिवली (दहावा)

 

15 वर्षाखालील मुले - 5 किमी

अक्षय संजय सावंत, शारदा विद्यामंदीर, अनगांव (प्रथम), मनोज मगन गोविंद, जय संतोषी माता, अनगांव  (व्दितीय), अशोक कालूराम वारगुडे, एम.एच. विद्यालय (तृतीय), शिरिष भरत पवार, जय संतोषी माता, आनगांव (चतुर्थ), हरिराम चंद्र मौर्य, वी.एस.स्‍पोर्टस्, बदलापूर (पाचवा), श्शिकांत प्रदिप चौहान, वी.एस.स्‍पोटस्, बदलापूर (सहावा), दिनेश राम पठारे, शारदा विद्यामंदीर, अनगांव  (सातवा), सौरभ् जयवंत रनवरे, रा.शाह महाराज विद्यालय, नवी मुंबई (आठवा), सचिन दिलीप सकपाळ, एम.एच. विद्यालय, ठाणे (नववा), पुजाराम चंद्र मौर्या, वी.एस. स्पोर्टस (दहावा)

             

15 वर्षाखालील मुली - 5 किमी

अश्विनी प्रभाकर मोरे, राजश्री शाहू मवी मुंबई (प्रथम), नेहा केशव फुफाणे, शारदा विद्या मंदीर (व्दितीय), किशोरी सुनिल मोकाशी, शिवभक्त विद्यामंदीर बदलापूर (तृतीय), साक्षी कृष्णा जाधव, गणेश क्रिडा मंडळ, ठाणे (चतुर्थ), शालीनी शंकर वाघे, राजश्री शाहू मवी मुंबई (पाचवा), कांचन युवराज हलगरे, राजश्री शाहू मवी मुंबई (सहावा), साधना दत्तात्रय गायकवाड, राजश्री शाहू मवी मुंबई (सातवा), दर्शना प्रभाकर दांगटे, जय संतोषी माता अनगाव, (आठवा), पिंकी शांराराम दुदेडा, जय संतोषी माता अनगाव, (नववा), अर्चना नरेश खुताडे, जय संतोषी माता अनगाव, (दहावा)

 

12 वर्षाखालील मुले - 3 किमी

संजय प्रसाद बिंद, गार्डियन हायस्कुल, डोंबिवली (प्रथम), अमोल कृष्णा भोये, शारदा विद्यामंदीर, अनगांव (व्दितीय), अनिल हिरामण वैजल, शारदा विद्यामंदीर, अनगांव (तृतीय), विवेक किरण पाटील, शारदा विद्यामंदीर, अनगांव (चतुर्थ), कल्पेश सदाशिव गायकर, शारदा विद्यामंदीर, अनगांव (पाचवा), अभिषेक उमाशंकर भारव्दाज, व्ही एस. स्पोर्टस क्लब, बदलापूर (सहावा), गणेश रामचंद्र उत्तेकर, लक्ष्मी विद्यामंदीर, विटावा (सातवा), सुशील तुकाराम जपनकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज, राबाडा (आठवा), तेजस कांतिलाल परदेशी, अजिंक्यतारा स्पोर्टस क्लब (नववा), रोहीत तन्वर, जी.एस.डब्ल्यू क्लब (दहावा)

 

12 वर्षाखालील मुली - 3 किमी

परीना प्रकाश खिल्लारी, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल, ठाणे (प्रथम), यज्ञिका कृष्‍्णा दळवी, राजर्श्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय, नवी मुंबई (व्दितीय), पल्‍लवी झा, जिंदाल स्पोर्टस्, वाशिंद (तृतीय), संजना राय, जिंदाल स्पोर्टस्, वाशिंद (चतुर्थ), संजना सावंत, ट्रॅक अ‍ॅँड फिल्ड मास्टर, ठाणे, (पाचवी), सरीता पटेल, जिंदाल स्पोर्टस्, वाशिंद (सहावी), काजल बाबू शेख, राजर्श्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय, नवी मुंबई (सातवी), श्रावणी अनिल गुरव, श्रीमती राधिकबाई मेघे विद्यालय, ऐरोली, नवी मुंबई (आठवी), गायत्री ए. शिंदे, सेव्‍हन स्‍टार स्पोर्टस् अकॅडमी, ठाणे (नववी), संस्कृती जाधव, सेव्‍हन स्‍टार स्पोर्टस् अकॅडमी, (दहावी).

   

ज्येष्ठ नागरिक गट

सतपाल सिंग, जे.एस.डब्ल्यू वाशिंद (प्रथम), संभाजी धोंडू डेरे, नारायण गाव, दिवा (व्दितीय), एकनाथ रघुनाथ पाटील, कलानिकेतन कोनगाव (तृतीय), किसन गणपत अरबूज, वर्तकनगर, ठाणे (चतुर्थ), चंद्रकांत गणपत गायकवाड, घणसोली (पाचवा)                                   

ज्येष्ठ नागरिक महिला गट

नानकी नंदलाल निहलानी (प्रथम), सुनंदा विजय देशपांडे (व्दितीय), सुजाता चंद्रकांत हळवे (तृतीय), सविता सदाशिव जोशी (चतुर्थ)

 

'रन फॉर फन'  

कल्पेश शरद राठोड (प्रथम), प्रसाद तेंडूलकर (व्दितीय), दत्तात्रेय उतेक (तृतीय), सिध्दांत नरेंद्र श्रीधनक (चतुर्थ), किरण लहामटे (पाचवा)

Web Title: Army's Ranjeet Singh wins Thane Rain Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.