Asian Games 2018 : भारताची सुवर्णहॅट्ट्रिक हुकली, पुरुषांच्या रिलेमध्ये भारताला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 07:13 PM2018-08-30T19:13:07+5:302018-08-30T19:25:37+5:30
Asian Games 2018: जर भारताने पुरुषांच्या 4 बाय 400 मी. प्रकारात सुवर्णपदक पटकावले असते तर आजच्या दिवशी भारताची सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक झाली असती.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : महिलांनी रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावल्यावर पुरुषही सोनेरी कामगिरी करतील, असे वाटत होते. जर भारताने पुरुषांच्या 4 बाय 400 मी. प्रकारात सुवर्णपदक पटकावले असते तर आजच्या दिवशी भारताची सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक झाली असती. पण भारतीय पुरुष रिले संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताने 4 बाय 400 हे अंतर 3:01.85 मिनिटांमध्ये पूर्ण केले. या गटात कतारने सुवर्णपदक पटकावले.
#AsianGames2018: India win silver medal in men's 4 X 400m Relay event. pic.twitter.com/xL3iZdET62
— ANI (@ANI) August 30, 2018
भारताच्या पुरुष रिले संघामध्ये मोहम्मद अनास, अरोकिआराजीव, कुन्हु मोहम्मद आणि धारुन अय्यासामी यांचा समावेश होता.