‘चित्राप्रकरणी न्यायालयाचा सन्मान करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 11:37 PM2017-07-29T23:37:51+5:302017-07-29T23:38:01+5:30

आगामी विश्व अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय धावपटू पी.यू. चित्रा हिला देशाचे प्रतिनिधित्व करता यावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने

caitaraaparakaranai-nayaayaalayaacaa-sanamaana-karaa | ‘चित्राप्रकरणी न्यायालयाचा सन्मान करा’

‘चित्राप्रकरणी न्यायालयाचा सन्मान करा’

googlenewsNext

नवी दिल्ली : आगामी विश्व अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय धावपटू पी.यू. चित्रा हिला देशाचे प्रतिनिधित्व करता यावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने दिले आहेत. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) या निर्देशाचे पालन करावे असा सल्ला क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दिला.
केरळ उच्च न्यायालयाने कालच केंद्र सरकारला निर्देश देत पुढील महिन्यात लंडनमध्ये आयोजित विश्व अ‍ॅथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चित्राचा समावेश होण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यास सांगितले. यावर गोयल यांनी एएफआय प्रमुख आदील सुमारीवाला यांच्याशी चर्चा केली. केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देऊू नका, असा सल्ला गोयल यांनी दिला. (वृत्तसंस्था)

Web Title: caitaraaparakaranai-nayaayaalayaacaa-sanamaana-karaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.