फेडरेशन चषक अॅथलेटीक्स, स्वाती गाढवेला रौप्य, आरतीला कांस्यपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 04:39 AM2018-03-06T04:39:24+5:302018-03-06T04:39:24+5:30
महाराष्ट्राच्या स्वाती गाढवेने २२ व्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्टÑीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पहिल्याच दिवशी रौप्यपदक जिंकले. तमिळनाडूच्या एल. सुरियाने सुवर्ण, तर महाराष्टÑाच्याच आरती पाटीलने कांस्यपदक आपल्या नावावर केले.
पतियाळा : महाराष्ट्राच्या स्वाती गाढवेने २२ व्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्टÑीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पहिल्याच दिवशी रौप्यपदक जिंकले. तमिळनाडूच्या एल. सुरियाने सुवर्ण, तर महाराष्टÑाच्याच आरती पाटीलने कांस्यपदक आपल्या नावावर केले.
भारतीय अॅथलेटीक्स फेडरेशच्यावतीने एनआयएस पतियाळा येथे सोमवार सुरू झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत नुकताच महाराष्टÑ शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या स्वातीने १६ मि. ०७.६३ सेकंदाची वेळ नोदविली. तमिळनाडूच्या एल. सुरियाने १५ मि. ४६.९६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्ण जिंकले, तर आरती पाटीलला (१६ मि. २७.३९ से.) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्टÑाच्या कृष्णकुमार राणे (१०.७० से.) आणि अनिरुद्ध गुजर (१०.८७ से.) यांनी अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली. महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सिद्धी हिरे व चैत्राली गुजरने अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्टÑाच्या सचिन पाटीलला (१४ मि. ०९.५७ से.) चौथ्या, अनिल पवारला (१४ मि. २९.१२ से.) सहाव्या आणि किसन तडवीला (१४ मि. ३५.८५ से.) सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्टÑाच्या सोनाली देसाई व ताई बामनेने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (वृत्तसंस्था)