हिमा दासची 'सुवर्ण'पंचमी! महिनाभरात पटकावले पाचवे सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 09:05 AM2019-07-21T09:05:46+5:302019-07-21T09:06:34+5:30
ढिंग एक्स्प्रेस या नावाने प्रसिद्ध झालेली भारताची युवा धावपटू हिमा दास हिची सध्या सोनेरी दौड सुरू आहे.
Next
प्राग - ढिंग एक्स्प्रेस या नावाने प्रसिद्ध झालेली भारताची युवा धावपटू हिमा दास हिची सध्या सोनेरी दौड सुरू आहे. शनिवारी झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अव्वलस्थान पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले. हे हिमा दास हिचे गेल्या महिनाभरातील पाचवे सुवर्णपदक ठरले आहे.
Finished 400m today on the top here in Czech Republic today 🏃♀️ pic.twitter.com/1gwnXw5hN4
— Hima MON JAI (@HimaDas8) July 20, 2019
हिमा हिने ट्विटरवर एक फोटो शेअर करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. झेक प्रजासत्ताक येथे 400 मीटर शर्यत अव्वलस्थानी राहत पूर्ण केली. हिमा हिने 52.09 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. याआधी झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या टबोर अॅथलेटिक्स मीट स्पर्धेत हिमाने २०० मीटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी केली. २३.२५ सेकंदाची वेळ देत तिने शानदार बाजी मारली होती.
हिमाची सुवर्ण कामगिरी
2 जुलैला पोजनान अॅथलेटिक्स
ग्रां. प्री. स्पर्धेत 200 मी. 23.65 सेकंदासह शर्यतीत सुवर्ण.
7 जुलैला कुटनो अॅथलेटिक्स
मीट स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत 23.97 सेकंदासह सुवर्ण.
13 जुलै झेक प्रजासत्ताक
येथे क्लांदो अॅथलेटिक्स 200 मीटर शर्यतीत 23.43 सेकंदासह सुवर्ण.
18 जुलै, झेक प्रजासत्ताक
टबोर अॅथलेटिक्स मीट, २०० मीटर शर्यतीत २३.२५ सेकंदांसह सुवर्ण.
20 जुलै झेक प्रजासत्ताक
नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. 400 मीटर शर्यतीत 52.09 सेकंदांसह सुवर्णपदक.