मुलांनो मोबाईल सोडा आणि मैदानात चला... सांगेतय पीटी उषा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 09:08 PM2018-11-15T21:08:51+5:302018-11-15T21:13:34+5:30

मुलांनो मोबाईल सोडा आणि मैदानात चला, असा संदेश तिने युवा पीढीला दिला आहे.

Kids leave the mobile and go to the ground ... | मुलांनो मोबाईल सोडा आणि मैदानात चला... सांगेतय पीटी उषा

मुलांनो मोबाईल सोडा आणि मैदानात चला... सांगेतय पीटी उषा

Next
ठळक मुद्देसध्याच्या घडीला लहान मुलं खेळतात, पण ती मोबाईमध्ये.

मुंबई : सध्याच्या घडीला लहान मुलं खेळतात, पण ती मोबाईमध्ये. त्यामुळे सध्याची युवा पीढी ही जास्त मैदानात खेळताना दिसत नाही. या साऱ्या गोष्टी भारताची माजी धावपटू पीटी उषाला समजल्या आहेत. त्यामुळेच मुलांनो मोबाईल सोडा आणि मैदानात चला, असा संदेश तिने युवा पीढीला दिला आहे.

उषा म्हणाल्या, " सध्याच्या घडीला लहान मुलं मैदानात फार कमी दिसतात. मोबाईलमध्ये गेम खेळण्यामध्येच त्यांना अधिक रस आहे. पण ते फक्त मोबाईलमध्ये खेळ खेळत राहीले तर भारताला चांगले खेळाडू मिळू शकणार नाहीत. मोबाईल वाईट आहे, असे मला म्हणायचे नाही. पण प्रत्येकाने एखाद्या गोष्टीचा किती आणि कसा वापर करायचा हे ठरवायला हवे. आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी मोबाईल कमी वेळा वापरले होते, त्यामुळे त्यांना चांगली कामगिरी करता आली. "

Web Title: Kids leave the mobile and go to the ground ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.