सोनिया मोकलची सातासमुद्रापार भरारी, आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलॅटिक : कॅलिफोर्निया येथे पटकावले सुवर्ण पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 03:06 AM2017-09-21T03:06:54+5:302017-09-21T03:06:58+5:30

अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील ग्रामीण भागात राहणारी सोनिया मोकल हिने सातासमुद्रावर भरारी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलॅटिक मुंबई पोलीस या स्पर्धेमधून अमेरिका कॅलिफोर्निया येथे सुवर्ण पदक जिंकून भारताचे नाव मोठे केले आहे.

Sonia Mokal's Satas Smrpar Bharari, International athletic: Gold Medal in California | सोनिया मोकलची सातासमुद्रापार भरारी, आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलॅटिक : कॅलिफोर्निया येथे पटकावले सुवर्ण पदक

सोनिया मोकलची सातासमुद्रापार भरारी, आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलॅटिक : कॅलिफोर्निया येथे पटकावले सुवर्ण पदक

Next

सुनील बुरुमकर।

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील ग्रामीण भागात राहणारी सोनिया मोकल हिने सातासमुद्रावर भरारी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलॅटिक मुंबई पोलीस या स्पर्धेमधून अमेरिका कॅलिफोर्निया येथे सुवर्ण पदक जिंकून भारताचे नाव मोठे केले आहे.
सोनिया ही हाशिवरे या गावाची रहिवासी असूून, घरची परिस्थिती बेताचीच, परंतु मनातील जिद्द आणि क्रीडा क्षेत्रातील आवड यामुळे तिने आपल्या क्रीडा गुणांना जोपासले. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच महात्मा गांधी विद्यालय येथे झाले आणि शाळेत असताना तिने धावणे व खो-खो या खेळामध्ये राज्यस्तरीय तर राष्ट्रीय पातळीवर आपली चुणूक दाखवून पारितोषिके मिळविलेली आहेत. शालेय स्पर्धेमध्ये तिला शाळेतील शिक्षक गायकवाड यांनी मार्गदर्शन करून सहकार्य के ले. दहावीनंतर पुढील शिक्षण पीएनपी कॉलेज, वेश्वी येथे झाले. त्या वेळी तिला तेजस म्हात्रे या प्रशिक्षणार्थींचे मार्गदर्शन मिळाले.
शिक्षण झाल्यानंतर २०११ साली ती मुंबई पोलीसमध्ये भरती झाली. पोलीसमध्ये सुद्धा आपल्या क्रीडामध्ये नैपुण्य दाखविले. त्यामध्ये तिची आंतरराष्ट्रीय पोलीस फायर खेळ, लॉसएंजल्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये निवड झाली.
या स्पर्धेमध्ये ८०० मीटरमध्ये गोल्ड, १५०० मीटरमध्ये सिल्व्हर मेडल तर ३००० मीटरमध्ये स्टेपलचेस सिल्व्हर मेडल अशी पदके मिळाली. या वेळी तिचे प्रशिक्षणार्थी भीमाजी मोरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्यामुळे तिचे पोलीस खात्यासह अलिबाग तालुक्यात तिचे कौतुक करण्यात आले.
सोनियाला तिचे आई-वडील आणि बहीण यांचे चांगले सहकार्य मिळाले अणि त्यांच्यापासूनच तिला प्रेरणा मिळाली असे तिने सांगितले.
>सोनियाला तिचे आई-वडील आणि बहीण यांचे चांगले सहकार्य मिळाले अणि त्यांच्यापासूनच तिला प्रेरणा मिळाली असे तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तर भविष्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये यापेक्षा उत्तम कामगिरी बजावण्याचे तिचे लक्ष्य आहे. त्या पद्धतीने ती मेहनत करत आहे.

Web Title: Sonia Mokal's Satas Smrpar Bharari, International athletic: Gold Medal in California

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.