ST बंदचा फटका, प्रवाशांनी खचाखच भरलेली खासगी बस नाल्यात पडली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 01:41 PM2022-02-25T13:41:50+5:302022-02-25T13:42:35+5:30

अमरावतीवरून मोर्शीमार्गे मध्य प्रदेशातील बैतुलकडे एक खासगी बस जात होती. ही खाजगी बस नाल्यात पलटी झाल्याची घटना अमरावती-नागपूर महार्गावर अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात घडली.

ST shut down, a bus full of passengers fell into the Nala in amravati | ST बंदचा फटका, प्रवाशांनी खचाखच भरलेली खासगी बस नाल्यात पडली

ST बंदचा फटका, प्रवाशांनी खचाखच भरलेली खासगी बस नाल्यात पडली

googlenewsNext

अमरावती - राज्यात अद्यापही एसटी बंद असल्याने खासगी प्रवासी वाहतूक जोर धरत आहे. त्यातच, शहरातील अर्जुन नगर परिसरात खासगी बस नाल्यात पलटली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. अमरावतीवरुन मोर्शीमार्गे मध्य प्रदेशकडे ही बस जात होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसमध्ये ४० पेक्षा अधिक प्रवासी होते. अमरावती-नागपूर महामार्गावरील अर्जुननगर परिसरातील घटना ही घटना घडली. 

अमरावतीवरून मोर्शीमार्गे मध्य प्रदेशातील बैतुलकडे एक खासगी बस जात होती. ही खाजगी बस नाल्यात पलटी झाल्याची घटना अमरावती-नागपूर महार्गावर अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात घडली. सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत. 
कुठलीच जीवितहानी झाली नाही. बसमध्ये जवळपास चाळीसपेक्षा जास्त प्रवासी होते. बस पूर्ण क्षमतेने होती. दरम्यान, किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे. 

दरम्यान, एसटी महामंडळच्या बस बंद आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर अमरावती शहरात अवैधपणे खासगी वाहतूक सुरू आहे. आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशमधील होशगांबाद येथील एक खासगी बस अमरावतीमधून मोर्शीमार्गे मध्य प्रदेशमध्ये प्रवासी घेऊन जात होती. सध्या एसटी बस बंद आहेत, त्यामुळं ही खासगी बस खचाखच प्रवाशांनी भरून होती. अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात ही बस येताच रोडच्या कडेला असलेल्या एका नाल्यात पलटी झाली. लहान चिमुकले बचावले. अपघाताचे कारण अस्पष्ट असून चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला, असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.

Web Title: ST shut down, a bus full of passengers fell into the Nala in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.