मानधन व भत्त्यातून सरपंचांनी गावाला दिले दोन वॉटर कूलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 05:49 PM2019-07-15T17:49:18+5:302019-07-15T17:50:11+5:30
रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील सरपंच श्रीकांत महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार वर्षांचे मानधन व भत्त्याच्या रकमेतून गावकऱ्यांची तृष्णा भागवण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी दोन उच्च क्षमतेचे वॉटर कूलर बसवून दिले. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील तांदलवाडी येथील सरपंच श्रीकांत महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार वर्षांचे मानधन व भत्त्याच्या रकमेतून गावकऱ्यांची तृष्णा भागवण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी दोन उच्च क्षमतेचे वॉटर कूलर बसवून दिले. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
एखाद्या शहराला लाजवेल अशा रचनात्मक विकासात भरारी घेतलेल्या तांदलवाडी गावात महाम़ंडलेश्वर श्री जनार्दन स्वामी हरी महाराज व मानेकर शास्त्री महाराज, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते श्रीराम मंदिर परिसर व नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात दोन वॉटर कूलरचे लोकार्पण करण्यात आले. निर्यातक्षम व गुणात्मक दर्जाचे केळी उत्पादन साता समुद्रापार जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्याचा नावलौकिक मिळवलेल्या या प्रगतशील गावाला रावेर कृउबा समिती संचालक श्रीकांत महाजन यांनी ग्रामविकासाचा नवा आयाम धरत सरपंच पदाची धुरा सांभाळली आहे.
गत चार वर्षांचे सरपंच मानधन ६३ हजार व ग्रामपंचायत सदस्यांचा भत्ता ४२ हजार रुपये असे एकूण १ लाख पाच हजार रूपये व्यक्तिगत कामासाठी न खर्च करता, सर्व ग्रा.पं.पदाधिकाºयांनी या मानधनाच्या रकमेतून गावात दोन वॉटर कूलर बसवले आहेत. या निर्णयाने ग्रामपंचायत पदाधिकारीयांचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
लोकार्पणप्रसंगी पं.स.सदस्या कविता कोळी, पोलीस पाटील सुधाकर चौधरी, किरण नेमाडे (खिर्डी), हरलाल कोळी, सदस्य मानसी पाटील, नारायण पाटील, नितीन महाजन, सुनील चौधरी, अरुण पाटील, गोकुल झाल्टे, जितेंद्र महाजन, उदय तायडे, गोकुळ चौधरी, नितीन सपकाळे, अरुण महाजन, प्रल्हाद पाटील, दत्तात्रय तायडे, राहुल पाटील, गोपाळ पाटील, सुमित पाटील, सुबोध महाजन, डॉ.वैभव पाटील, गणेश नामायते, मनोहर पाटील, प्रशांत महाजन, अंकूश महाजन, श्रीराम ठाकूर, डी.सी.पाटील, उदय चौधरी, विठ्ठल चौधरी, रमेश उन्हाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.