विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप : भारताची निराशाजनक सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 01:17 AM2017-08-06T01:17:56+5:302017-08-06T01:19:45+5:30
भारताने विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या मोहिमेची निराशाजनक सुरुवात केली. १०० मीटर दौड स्पर्धेत दुती चंद आणि रिले धावपटू मोहम्मद अनस याहया हे खेळाडू पहिल्या
लंडन : भारताने विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या मोहिमेची निराशाजनक सुरुवात केली. १०० मीटर दौड स्पर्धेत दुती चंद आणि रिले धावपटू मोहम्मद अनस याहया हे खेळाडू पहिल्या फेरीच्या हिटमध्ये ‘आऊट’ झाले. दुसºया दिवशी शनिवारी सात स्पर्धांच्या हेप्टॅथलॉनमध्ये स्वप्ना बर्मनची कामगिरी निराशाजनक ठरली.
पात्रता निकष पूर्ण न करताही कोटा आधारावर स्पर्धेत प्रवेश मिळवणारी दुती महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत पहिल्या फेरीत पाचव्या हिटमध्ये सहाव्या स्थानी राहिली. तिने १२.०७ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. तिला यंदाच्या मोसमातील वैयक्तिक सर्वोत्तम (११.३० सेकंद) कामगिरीची पुनरावृत्तीही करता आली नाही. तुरळक पावसामुळे ट्रॅक किंचित ओला होता आणि उष्णतामानही २० अंशांपेक्षा कमी होते. ४७ अॅथलिट््सचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दुती ३८ व्या स्थानी राहिली.
सहाव्या लेनमध्ये धावणाºया दुतीने सांगितले, की चुकीच्या पद्धतीने सुरुवात केल्यामुळे पाचव्या लेनमध्ये जर्मन अॅथलिट ततजाना पिटोला अपात्र ठरविण्यात आल्यानंतर माझ्यावर दडपण आले. दुतीने ११.२६ सेकंद वेळेचा निकष पूर्ण केला नव्हता, पण त्यानंतर सत्रात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे तिला कोटाच्या माध्यमातून स्पर्धेत स्थान मिळवता आले. जर्मनीची जीना लुकेनकेंपर १०.९५ सेकंद वेळेसह अव्वल स्थानी आहे. मारी जोसी तालू व मोरिले अहोरे अनुक्रमे दुसºया व तिसºया स्थानी आहेत. विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियन जमैकाची एलन थॉम्पसन पाचव्या स्थानी आहे.
पुरुषांच्या ४०० मीटर दौड स्पर्धेत पहिल्या फेरीत अनस सहाव्या हिटमध्ये होता. अव्वल तीनमध्ये येण्यासाठी त्याला ४५.७० सेकंद वेळेपेक्षा सरस वेळ नोंदवणे आवश्यक होते. त्याने मे महिन्यात दिल्ली येथे ४५.३२ सेकंद वेळेची नोंद केली होती.
शर्यतीनंतर प्रतिक्रिया देताना अनस म्हणाला, ‘मी अव्वल तीनमध्ये स्थान मिळवू शकलो असतो, पण अखेरच्या ३०० मीटरमध्ये संधी गमावली. मी सुरुवातीच्या १०० मीटरमध्ये चांगली कामगिरी केली, पण त्यात सातत्य राखता आले नाही. आता पुढील वर्षी होणाºया राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे.’ (वृत्तसंस्था)
माझ्या बाजूच्या खेळाडूला अपात्र ठरविण्यात आले. मला अपेक्षित वेगाने पळता आले नाही. त्यामुळे माझी कामगिरी निराशाजनक झाली. वातावरण थंड होते. भारतात वातावरण उष्ण असल्यामुळे चांगली वेळ नोंदवली होती.
- दुती चंद
विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप :
लंडन : भारताने विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या मोहिमेची निराशाजनक सुरुवात केली. १०० मीटर दौड स्पर्धेत दुती चंद आणि रिले धावपटू मोहम्मद अनस याहया हे खेळाडू पहिल्या फेरीच्या हिटमध्ये ह्यआऊटह्ण झाले. दुसºया दिवशी शनिवारी सात स्पर्धांच्या हेप्टॅथलॉनमध्ये स्वप्ना बर्मनची कामगिरी निराशाजनक ठरली.
पात्रता निकष पूर्ण न करताही कोटा आधारावर स्पर्धेत प्रवेश मिळवणारी दुती महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत पहिल्या फेरीत पाचव्या हिटमध्ये सहाव्या स्थानी राहिली. तिने १२.०७ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. तिला यंदाच्या मोसमातील वैयक्तिक सर्वोत्तम (११.३० सेकंद) कामगिरीची पुनरावृत्तीही करता आली नाही. तुरळक पावसामुळे ट्रॅक किंचित ओला होता आणि उष्णतामानही २० अंशांपेक्षा कमी होते. ४७ अॅथलिट््सचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दुती ३८ व्या स्थानी राहिली.
सहाव्या लेनमध्ये धावणाºया दुतीने सांगितले, की चुकीच्या पद्धतीने सुरुवात केल्यामुळे पाचव्या लेनमध्ये जर्मन अॅथलिट ततजाना पिटोला अपात्र ठरविण्यात आल्यानंतर माझ्यावर दडपण आले. दुतीने ११.२६ सेकंद वेळेचा निकष पूर्ण केला नव्हता, पण त्यानंतर सत्रात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे तिला कोटाच्या माध्यमातून स्पर्धेत स्थान मिळवता आले. जर्मनीची जीना लुकेनकेंपर १०.९५ सेकंद वेळेसह अव्वल स्थानी आहे. मारी जोसी तालू व मोरिले अहोरे अनुक्रमे दुसºया व तिसºया स्थानी आहेत. विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियन जमैकाची एलन थॉम्पसन पाचव्या स्थानी आहे.
पुरुषांच्या ४०० मीटर दौड स्पर्धेत पहिल्या फेरीत अनस सहाव्या हिटमध्ये होता. अव्वल तीनमध्ये येण्यासाठी त्याला ४५.७० सेकंद वेळेपेक्षा सरस वेळ नोंदवणे आवश्यक होते. त्याने मे महिन्यात दिल्ली येथे ४५.३२ सेकंद वेळेची नोंद केली होती.
शर्यतीनंतर प्रतिक्रिया देताना अनस म्हणाला, ह्यमी अव्वल तीनमध्ये स्थान मिळवू शकलो असतो, पण अखेरच्या ३०० मीटरमध्ये संधी गमावली. मी सुरुवातीच्या १०० मीटरमध्ये चांगली कामगिरी केली, पण त्यात सातत्य राखता आले नाही. आता पुढील वर्षी होणाºया राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे.ह्ण (वृत्तसंस्था)