कराड यांना नगरसेवक, महापौर मी केले; त्यांची माझ्यासोबत तुलना होऊच शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 01:41 PM2021-08-13T13:41:17+5:302021-08-13T13:56:49+5:30

दिल्लीत असूनही शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना भेटून शुभेच्छा दिल्या नाहीत.

Chandrakant Khaire says, I will not greet Raosaheb Danave and Karad will come to meet me | कराड यांना नगरसेवक, महापौर मी केले; त्यांची माझ्यासोबत तुलना होऊच शकत नाही

कराड यांना नगरसेवक, महापौर मी केले; त्यांची माझ्यासोबत तुलना होऊच शकत नाही

googlenewsNext
ठळक मुद्देमाझी आणि डॉ. कराड यांची तुलना व्होऊ शकत नाही. रावसाहेब दानवे यांच्यामुळे माझा पराभव केला

औरंगाबाद : रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve) आणि डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad ) यांच्या मंत्रीपदाने शिवसेनेला मराठवाड्यात शह भेटेल असे भाजपला ( BJP ) वाटत असेल. मात्र, याउलट यामुळे शिवसैनिक ( Shiv Sena ) पेटून उठतील असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी केला आहे. जावयाच्या माध्यमातून दानवे यांनी खासदारकीच्या निवडणुकीत माझा पराभव केला त्यांना शुभेच्छा देणार नाही. तर डॉ. कराडांना मी खूप सिनिअर आहे. ते मला भेटायला येतील असेही खैरे म्हणाले. ( Chandrakant Khaire says, I will not greet Raosaheb Danave and Karad will come to meet me ) 

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे नुकतेच दिल्लीत गेले होते. दिल्लीत असूनही  त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना भेटून शुभेच्छा दिल्या नाहीत. याबाबत एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना खुलासा करताना खैरे म्हणाले, माझी आणि डॉ. कराड यांची तुलना व्होऊ शकत नाही. डॉ. कराड यांना लोकसभेचं तिकिट दिलं तरी काहीच हरकत नाही. त्यांना नगरसेवक, महापौर मी केले. ते मला नेता मानतात, मला दिल्लीत वेळ नसल्याने भेटता आले नाही. ते मला भेटायला येतील. याचवेळी खैरे यांनी दानवे यांनी अर्धी भाजप माझ्या विरोधात कामाला लावली. जावयाच्या माध्यमातून त्यांनी माझा पराभव केला. त्यांना मी शुभेच्छा देणार नाही. दानवेंना याची शिक्षा मिळत असून त्यांनी कसेबसे मंत्रिपद टिकवून ठेवले आहे. 

मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला
मराठवाड्यात शिवसेनेला शह देण्यासाठी कराड आणि दानवे यांना मंत्रिपद देण्यात आलं असेल तर चांगलं आहे. हे शिवासैनिकांच्याही लक्षात येत असल्याने ते पेटून कामाला लागतात. औरंगाबादची युतीतही शिवसेनेची जागा होती. महाविकास आघाडीतही शिवसेनेचीच जागा आहे. इथे भाजप यशस्वी होऊ शकणार नाही, मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला राहील, असेही खैरे यावेळी म्हणाले.

Web Title: Chandrakant Khaire says, I will not greet Raosaheb Danave and Karad will come to meet me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.