जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढतोय; सक्रीय रुग्णांची संख्या सातशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 12:13 PM2021-02-20T12:13:47+5:302021-02-20T12:17:26+5:30

corona virus in Aurangabad जिल्ह्यात उपचारानंतर शुक्रवारी दिवभरात ५५ जणांना सुटी देण्यात आली आहे 

Corona is growing rapidly in the district; The number of active patients exceeds seven hundred | जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढतोय; सक्रीय रुग्णांची संख्या सातशे पार

जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढतोय; सक्रीय रुग्णांची संख्या सातशे पार

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी तीन अंकी कोरोना बाधितांची भरशुक्रवारी कोरोनाचे १५८ रुग्ण वाढले तर ४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी १५८ कोरोनाबाधितांची भर पडली, तर ४ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. दिवसभरात ५५ रुग्णांना उपचार पूर्ण झाल्याने सुटी देण्यात आली. यात शहरातील ४, ग्रामीणमधील ११ जणांचा समावेश आहे. कोरोना रुग्णसंख्येने सलग चौथ्या दिवशी तीन अंकी आकडा गाठल्याने सक्रिय रुग्णसंख्या सातशे पार पोहचली आहे.

जिल्ह्यात ग्रामीणमध्ये १५ रुग्णांची भर पडली तर शहरात तब्बल १४३ रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या ७०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ हजार २९३ झाली आहे. आजपर्यंत ४६ हजार ३४२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण १२५० जणांचा मृत्यू झाला आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले.

मनपा हद्दीत १४३ रुग्ण
घाटी परिसर २, नूतन कॉलनी १, गोलवाडी १, नाथ व्हॅली २, ज्ञानेश्वर नगर १, राम नगर, सिडको १, स्काय सिटी, बीड बायपास १, सह्याद्री नगर १, उल्का नगरी १, शिवाजी नगर २, चेतना नगर १, इटखेडा २, सातारा परिसर २, श्रेय नगर १, सारंग सो. १, मातोश्री नगर १, आदर्श नगर १, पन्नालाल नगर २, संत तुकोबा नगर १, ब्ल्यू बेल सोसायटी १, स्पंदन नगर १, कासलीवाल पार्क १, राम नगर १, गुरूसहानी नगर १, एसबीआय निवासस्थान परिसर १, राजेश नगर, बीड बायपास १, गुलमंडी परिसर १, ओमकार गॅस एजन्सीच्या मागे २, पारिजात नगर, एन पाच १, सम्यक आर्केड १, एन पाच श्रेय नगर २, जटवाडा रोड १, सुंदर नगर, नागेश्वरवाडी १, एन तीन सिडको १, एन पाच सिडको १, बीड बायपास १, विष्णू नगर, आकाशवाणी परिसर १, अप्रतिम सो., सातारा परिसर १, एन सात सिडको १, मयूर पार्क हडको १, मुथा कॉम्प्लेक्स, उल्का नगरी २, पैठण रोड २, हर्सुल, पिसादेवी १, हनुमान नगर १, ज्योती नगर १, न्यू गणेश नगर २, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ १, बन्सीलाल नगर १, अलोक नगर १, छावणी परिसर १, एन सहा, सिडको १, बालाजी नगर १, अन्य ८०.

ग्रामीण भागात १५ रुग्ण
नागद, कन्नड १, वाघुली १, हिवरखेडा, गौताळा १, शिऊर, वैजापूर १, कन्नड १, कडेठाण, पैठण १, वडगाव कोल्हाटी १, अन्य ८ रुग्ण आढळून आले.

४ बाधितांचा मृत्यू
घाटीत संजय नगर, बायजीपुऱ्यातील ३८ वर्षीय पुरुष, पैठण तालुक्यातील पाचोड येथील ७५ वर्षीय महिला, चिखलठाण्यातील सविता मंगल कार्यालय येथील ६५ वर्षीय पुरुष आणि वरूडकाझी, करमाड येथील ५२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वाढती संख्या चिंताजनक :
दिनांक : बाधित रुग्ण
१५ फेब्रुवारी - ७७
१६ फेब्रुवारी - १२०
१७ फेब्रुवारी - १३७
१८ फेब्रुवारी - १५६
१९ फेब्रुवारी - १५८

Web Title: Corona is growing rapidly in the district; The number of active patients exceeds seven hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.