पाकिस्तानच्या तुरुंगातून १८ वर्षांनंतर महाराष्ट्रात परतलेल्या हसीना बेगम यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 05:34 PM2021-02-09T17:34:25+5:302021-02-09T17:43:23+5:30

hasina begum : पाकिस्तानात तब्बल १८ वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर २६ जानेवारी रोजी भारतात परतलेल्या ६५ वर्षीय हसीना बेगम यांचं निधन

hasina begum who returned from pakistan after 18 years died in aurangabad | पाकिस्तानच्या तुरुंगातून १८ वर्षांनंतर महाराष्ट्रात परतलेल्या हसीना बेगम यांचं निधन

पाकिस्तानच्या तुरुंगातून १८ वर्षांनंतर महाराष्ट्रात परतलेल्या हसीना बेगम यांचं निधन

googlenewsNext

पाकिस्तानात तब्बल १८ वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर २६ जानेवारी रोजी भारतात परतलेल्या ६५ वर्षीय हसीना बेगम (hasina begum) यांचं निधन झालं आहे. त्या औरंगाबादच्या रशदपुरा येथील रहीवासी होत्या. वृद्धापकाळाने त्याचं आज निधन झालं आहे. त्यांची नमाजे जनजा रशीदपुरा येथील मोहंमदीया मस्जिद मध्ये दुपारी नमाज जोहरमध्ये अदा करण्यात आली. मायदेशी परतल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. मायभूमीत अखेरचा श्वास घेवून त्यांनी जगातून निरोप घेतला. औरंगाबाद येथील पीरगैब कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांना वारस नसल्याने नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी दफनविधी केले. (hasina begum who returned from pakistan after 18 years died in aurangabad)

पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी औरंगाबादमधील हसीना बेगम १८ वर्षांपूर्वी पाकिस्तानामध्ये गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा पासपोर्ट हरवल्याने त्यांना तब्बल १८ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये काढावे लागले. औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तान न्यायालयात केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची सुटका झाली आहे. प्रजासत्ताक दिनी हसीना बेगम औरंगाबाद येथे परतल्या होत्या. 

नेमकं काय घडलं होतं?
हसीना बेगम या औरंगाबादमधील रशिदपुरा परिसरातील आहेत. त्यांचा निकाह उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचा रहिवासी असलेल्या दिलशाद अहमदसोबत झाला होता. १८ वर्षांपूर्वी त्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासही पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. या दरम्यान, त्यांचा पासपोर्ट लाहोर येथे हरवला. यामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये कैद करण्यात आले. आपण निर्दोष असल्याचं हसीना बेगम यांनी पाकिस्तानच्या कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मागितली. हसीना बेगम यांच्या नावावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकृत घर आहे, अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला पाठवली. त्यानंतर पाकिस्तानने मागील आठवड्यात त्यांची सुटका केली आणि त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं. 

१८ वर्षानंतर औरंगाबादमध्ये परतल्यानंतर प्लॉट हडप
तब्बल १८ वर्षानंतर हसीना बेगम भारतात परतल्या. मात्र, शहरात परतल्यानंतर ज्या प्लॉटच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची सुटका झाली तोच प्लॉट भूमाफियांनी बळकावला असल्याचे उघडकीस आले होते. आपला प्लॉट परत मिळावा यासाठी हसीना बेगम पोलीस आयुक्तांची भेट देखील घेणार होते. हसीना बेगम यांनी १८ जुलै २००० साली शहरातील रशिद्पुरा येथे एक प्लॉट विकत घेतला होता. याची रजिस्ट्री करण्यात आली होती. यानंतर त्यांचे लग्न झाले आणि त्या उत्तरप्रदेशातील सहारणपूर येथील शेख दिलशाद अहमद यांच्यासोबत झाले. त्यांना मूलबाळ नाही. २००४ साली त्या नातेवाइकांना भेटण्यासाठी रेल्वेने पाकिस्तानला गेल्या होत्या. तेव्हा तेथे त्यांच्या नातेवाइकांची भेट झाली नाही. मात्र, त्यांचा पासपोर्ट हरवला. तेव्हा संशयित म्हणून त्यांना तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले आणि जेलमध्ये टाकले. तेव्हापासून त्या मायदेशी परत येण्यासाठी प्रयत्न करीत होत्या.

Read in English

Web Title: hasina begum who returned from pakistan after 18 years died in aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.