Maharashtra Election 2019 : हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 04:21 PM2019-10-18T16:21:52+5:302019-10-18T16:25:08+5:30

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आदर्श आचारसंहिता पथक प्रमुखाने दिली तक्रार

Maharashtra Election 2019 : breach of code of conduct case files against Harshavardhan Jadhav | Maharashtra Election 2019 : हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Maharashtra Election 2019 : हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देभाषणादरम्यान आदर्श आचारसंहिता भंग होईल, असे वक्तव्य केले.

औरंगाबाद/पिशोर : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन रायभान जाधव यांच्याविरुद्ध गुरुवारी (दि.१७) पिशोर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला . आदर्श आचारसंहिता पथकप्रमुख राजमहेंद्र डोंगरदिवे यांनी गुरुवारी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. जाधव यांच्या अश्लाघ्य वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर बुधवारी  तणाव निर्माण होऊन त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. राजमहेंद्र डोंगरदिवे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  १४ आॅक्टोबर रोजी सोमवारी करंजखेडा येथील सभेत जाधव यांनी भाषणादरम्यान आदर्श आचारसंहिता भंग होईल, असे वक्तव्य केले. यावरून पिशोर पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शिवराळ व अश्लाघ्य भाषेत टीका करताना जाधव यांनी मातृत्वाचाच अपमान केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच  कार्यकर्त्यांनी पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, सिडको, क्रांतीचौक, सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रारी देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी मध्यरात्रीनंतर जाधव यांच्या शहरातील घरावर व कारवर दगडफेक झाल्याची कथीत घटनाही घडली. 

मी ठाकरे कुटुंबाबाबत बोललोच नाही
दगडफेक समोरासमोर येऊन करा, मग बघू काय व्हायचे ते. मी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, त्यांच्या आईबाबत काहीही बोललो नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना बोललो आहे. हवे तर रेकॉर्डिंग तपासून पहा. माझ्या नावाने खापर फोडणारे शिवसैनिक, म्हणजे चंद्रकांत खैरे आहेत.

जाधव यांची ही स्टंटबाजी - दानवे
शिवसेना जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे म्हणाले, हर्षवर्धन जाधव यांनी स्टंटबाजी केली. सहानुभूती मिळण्यासाठीच त्यांनी स्वत:च हल्ल्याचा स्टंट केला आहे. ते जरी म्हणत असतील की, मी ठाकरे कुटुंबाबाबत वक्तव्य केले नाहीत. परंतु रेकॉर्डिंगमध्ये सगळे काही दिसते व ऐकू येते आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी. आम्हीही त्यांच्या कुटुंबाबाबत बोललो असतो, परंतु आमची ती संस्कृती नाही. खैरेंशी त्यांचे भांडण आहे, तर मग त्यांनी खैरेंवर बोलावे. शिवसेनेने ऐकून घेतले, याचा अर्थ शिवसेना गप्प बसली आहे, असा होत नाही. 

हर्षवर्धन जाधव यांच्या बंगल्यावर दगडफेक
कन्नड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थनगर, श्रीराम कॉलनीतील बंगल्याच्या आवारात उभ्या कारच्या काचा अज्ञातांनी दगडफेक करून फोडल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास घडला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हा उद्दामपणा असल्याचा आरोप जाधव यांनी केला. याविषयी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात सुरक्षारक्षकाने तक्रार दिली आहे.
 

Web Title: Maharashtra Election 2019 : breach of code of conduct case files against Harshavardhan Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.