इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत छेडछाड; डॉक्टरला जमावाने बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 02:09 PM2021-09-04T14:09:16+5:302021-09-04T14:10:08+5:30

Crime News in Aurangabad : महिलेची तपासणी करून औषधीची चिठ्ठी लिहून देत तिच्या सासूला मेडिकलमध्ये औषधी आणण्यासाठी पाठवून दिले.

Molestation of a woman patient under the pretext of giving injections; The doctor was beaten by the crowd | इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत छेडछाड; डॉक्टरला जमावाने बदडले

इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत छेडछाड; डॉक्टरला जमावाने बदडले

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपी डॉक्टरविरुध्द गुन्हा दाखल

वाळूज महानगर : खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्ण महिलेची छेड काढणाऱ्या डॉक्टरला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी जोगेश्वरीत घडली. या छेडछाड प्रकरणी आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Molestation of a woman patient under the pretext of giving injections; The doctor was beaten by the crowd) 

वाळूज एमआयडीसी परिसरातील एक १९ वर्षीय विवाहिता कान दुखत असल्याने सासूला सोबत घेऊन गुरुवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास जोगेश्वरीतील डॉ. नागेश शेजवळ याच्या रुग्णालयात गेली. दवाखान्यात गेल्यानंतर डॉ. नागेश याने त्या महिलेची तपासणी करून औषधीची चिठ्ठी लिहून देत तिच्या सासूला मेडिकलमध्ये औषधी आणण्यासाठी पाठवून दिले. त्या महिलेची सासू मेडिकलमध्ये गेल्यानंतर डॉ. नागेश याने तिला इंजेक्शन देण्याचा बहाणा करून तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेली महिला घरी निघून गेली. या छेडछाडीमुळे धक्का बसलेल्या महिलेने या घटनेची वाच्यता कुठेही केली नाही.

हेही वाचा - बाल भिकाऱ्यांचे पालक शोधणार; बालकल्याण समिती राबविणार 'मुस्कान' अभियान

छेडछाड करणाऱ्या डॉक्टरला बदडले
शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पीडित महिलेचा पती घरी आल्यानंतर त्याने पत्नीला तू काल दवाखान्यात गेली होती का, अशी विचारणा केली. तेव्हा तिने दवाखान्यात घडलेल्या प्रकाराची माहिती पतीला सांगितली. डॉक्टरने पत्नीची छेड काढल्याचे समजताच तिच्या पतीने नातेवाईक व गावातील नागरिकांना या प्रकाराची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नातेवाईक व गावातील काही जण दवाखान्यात डॉ. नागेश यास जाब विचारण्यासाठी गेले. मात्र या प्रकाराची कुणकुण लागताच त्याने दवाखान्यातून पळ काढला. यानंतर जमावाने डॉ. नागेश याचा पाठलाग करून वाळूज एमआयडीसीतील सुदर्शन कंपनीजवळ त्यास पकडून चोप देत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून डॉ. नागेश यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून छेडछाड करणाऱ्या डॉ. नागेशविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अधाणे हे करीत आहेत.

Web Title: Molestation of a woman patient under the pretext of giving injections; The doctor was beaten by the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.