Raosaheb Danve: "यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 07:58 PM2022-05-23T19:58:48+5:302022-05-23T19:59:25+5:30

"कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणाले- माझं कुटुंब माझी जबाबदारी. पण, तु्म्ही जबाबदारीपासून पळ काढला."

Raosaheb Danve: "ministers are in jail and CM is in house", Raosaheb Danve slams maharashtra govt | Raosaheb Danve: "यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Raosaheb Danve: "यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

googlenewsNext

औरंगाबाद: शहरातील भीषण पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या औरंगाबादकरांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपने आज भव्य जल आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी सभेला संबोधित करताना रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

"मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात"
यावेळी बोलताना रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री घरातून कामं करतात अशी टीका दानवेंनी केली. ते म्हणाले की, हे सरकार जेलमधून आणि घरातून काम करत. यांचे दोन मंत्री जेलात आणि मुख्यमंत्री घरात आहेत. कोरोना काळात आमच्या पक्षाचे आमदार-खासदार बाहेर फिरले पण मुख्यमंत्री बाहेर पडले नाहीत. कोरोना काळात त्यांनी काय घोषणा दिली? माझं कुंटंब माझी जबाबदारी. पण, तुम्ही जबाबदारी स्विकारली नाही. आमचे लोकं जनतेत गेले. तेव्हा फडणवीस म्हणाले होते, मुख्यमंत्री घरात आणि आम्ही तुमच्या दारात. त्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले." 

संबंधित बातमी- "हे तर जुम्मे के जुम्मे सरकार...", रावसाहेब दानवेंकडून सरकारचं नामकरण

"तुम्ही जबाबदारीपासून पळ काढला"
"मुख्यमंत्री सोलापूरला गेले, त्यांना शेतकरी म्हणाले- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अतिवृष्टी झाली, त्याची मदत मंजूर झालीये पण अजून मिळाली नाही. आम्हाला मदत करा. तर, मुख्यमंत्री म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी. त्यानंतर मुख्यमंत्री उस्मनाबादला गेले, तिथे हॉटेलवाले भेटले, ते म्हणाले- कोरोना काळात कर्ज काढलं, कोरोना आला आणि पैसे बुडाले. केंद्राने पॅकेज दिलं, तुम्ही आम्हाला मदत करा. हे सगळीकडे गेले आणि म्हणाले माझं कुटुंब माझी जबाबदारी. आरे पण, तु्म्ही जबाबदारीपासून पळ काढला," अशी टीकाही दानवेंनी केली.

"जनता कानशिलात लगावेल"
दानवे पुढे म्हणाले, "कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केली. लोकांना मोफत लस दिली, मोफत राशन दिलं, पण राज्याने काहीच दिलं नाही. आता आमची जनतेकडून एकच अपेक्षा आहे, जनतेनं यांना अद्दल घडवावी. हा मोर्चा फक्त भाजपचा नाही, आम्ही लोकांचा आवाज ऐकला आणि तो आवाज सरकारपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही विरोधीपक्ष म्हणून आमचं काम करतो. तुम्ही आज आमची हाक ऐका. सरकारने जनतेचं ऐकावं, नाहीतर ही जनता तुमच्या कानशिलात लगावल्याशिवाय राहणार नाही," असंही दानवे म्हणाले.

Web Title: Raosaheb Danve: "ministers are in jail and CM is in house", Raosaheb Danve slams maharashtra govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.