रेकॉर्ड ब्रेक ! औरंगाबाद जिह्यात मंगळवारी ५५० कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:41 PM2021-03-10T13:41:22+5:302021-03-10T13:44:52+5:30

Record break corona patients increased on single day in Aurangabad कोरोना विळख्याच्या ११ महिन्यांत जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात रेकॉर्ड ब्रेक तब्बल ५५० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली

Record break! An increase of 550 corona patients in Aurangabad district on Tuesday | रेकॉर्ड ब्रेक ! औरंगाबाद जिह्यात मंगळवारी ५५० कोरोना रुग्णांची वाढ

रेकॉर्ड ब्रेक ! औरंगाबाद जिह्यात मंगळवारी ५५० कोरोना रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवारी उपचारादरम्यान ८ जणांचा मृत्यू सध्या जिल्ह्यात ३,२२१ रुग्णांवर सुरू उपचार

औरंगाबाद : कोरोना विळख्याच्या ११ महिन्यांत जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात रेकॉर्ड ब्रेक तब्बल ५५० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर तब्बल ३७३ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ८ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ३,२२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५३ हजार ९०७ झाली आहे, तर आतापर्यंत ४९ हजार ३८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,३०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ५५० रुग्णांत सर्वाधिक मनपा हद्दीतील ४६२, तर ग्रामीण भागातील ८८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील तब्बल ३३७ आणि ग्रामीण भागातील ३६, अशा एकूण ३७३ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना मोरहिरा येथील ३२ वर्षीय पुरुष, वैजापुरातील ७५ वर्षीय पुरुष, चैतन्यनगर, सिडकोतील ४९ वर्षीय स्त्री, रेल्वेस्टेशन परिसरातील ५१ वर्षीय स्त्री, उस्मानपुरा येथील ८४ वर्षीय पुरुष, कन्नड तालुक्यातील माळीवाडा येथील ६५ वर्षीय पुरुष, शहरातील नॅशनल कॉलनीतील ७० वर्षीय पुरुष आणि ६९ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
एन दोन सिडको ४, शासकीय कर्करोग रुग्णालय परिसर १, सिडको २, गारखेडा ७, ब्रिजवाडी १, सातारा परिसर ११, एसआरपीएफ कॅम्प १, शंकुतलानगर १, आविष्कार कॉलनी १, जाधववाडी ३, पडेगाव ३, हिमायतबाग ५, एन सात येथे २, एन सहा येथे ८, खडकेश्वर १, नागेश्वरवाडी २, कॅनॉट प्लेस १, काल्डा कॉर्नर २, राणानगर १, संजयनगर २, मिलिटरी हॉस्पिटल १, भारतमातानगर १, बालाजीनगर ५, अमृतसाई प्लाझाच्या मागे, रेल्वेस्टेशन परिसर १, उस्मानपुरा २, रेल्वेस्टेशन परिसर १, आकाशवाणी कॉलनी २, जयभवानीनगर ४, एमजीएम हॉस्पिटल परिसर २, तापडियानगर २, एन दोन ठाकरेनगर २, पारिजातनगर १, गारखेडा, शिवनेरी कॉलनी २, मयूरपार्क ५, शहानूरवाडी ४, नक्षत्रवाडी ३, गुलमोहर कॉलनी १, एसबी कॉलनी वेस्ट २, टिळकनगर ३, म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पिटलजवळ, म्हाडा कॉलनी २, एन चार येथे ५, एन तीन येथे ३, अरुणोदय कॉलनी १, तोरणागडनगर १, एन वन येथे ५, एन पाच सिडको २, हनुमाननगर १, उत्तरानगरी, चिकलठाणा २, खडकेश्वर १, एन तीन, कामगार चौक, सिडको २, प्रकाशनगर १, एमआयडीसी चिकलठाणा १, इटखेडा २, शेंद्रा २, बीड बायपास ५, शकुंतलानगर १, समर्थनगर ३, वेदांतनगर ३, विराजनगर १, गुलमंडी १, श्रीकृष्णनगर, हडको १, शहागंज १, कासलीवाल मार्बल ३, शिवाजीनगर ४, उल्कानगरी ७, रेणुकानगर १, छत्रपती नगर ३, सवेरा कंपनी परिसर २, विद्यानगर १, अलंकार हा.सो १, पुंडलिकनगर १, जाधवमंडी १, जय भवानी विद्या मंदिर परिसर १, ज्ञानेश्वरनगर १, इंदिरानगर १, विजयनगर १, खिंवसरा पार्क १, मिटमिटा २, दशमेशनगर २, व्यंकटेश कॉलनी १, केंब्रिज स्कूल परिसर २, अशोकनगर २, बालकृष्ण नगर २, मयूरनगर १, एन बारा सिडको १, हर्सुल ५, तुळजाभवानी चौक १, सौभाग्य चौक १, एन तेरा येथे १, एन अकरा येथे २, भगतसिंगनगर १, भावसिंगपुरा १, संभाजी कॉलनी एन सहा येथे १, हडको ३, एन आठ, जिव्हेश्वर कॉलनी १, पिसादेवी १, हरसिद्धी मातानगर १, फाजिलपुरा २, एन नऊ येथे २, दर्गा रोड १, एम दोन, टीव्ही सेंटर १, कांचनवाडी ७, पंचशीलनगर १, न्यू भीमाशंकर कॉलनी १, जटवाडा रोड १, अष्टविनायकनगर १, संषर्ष नगर २, बंजारा कॉलनी २, ओमश्री गणेशनगर १, विष्णूनगर २, एन आठ येथे १, एमआयटी कॉलेज १, स्वराजनगर, मकुंदवाडी १, गादिया विहार १, पंचवटी हॉटेल परिसर १, कोकणवाडी १, धावणी मोहल्ला १, विश्वभारती कॉलनी १, बन्सीलालनगर ३, दिशा सिल्क सिटी, पैठण रोड १, घाटी परिसर १, प्रतापनगर १, संदेशनगर १, देवळाई २, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी २, एन बारा हडको १, एमआयटी कोविड केअर सेंटर १, पेशवेनगर ३, औरा व्हिलेज १, सूतगिरणी चौक परिसर २, पद्मपुरा १, स्नेहनगर १, देवानगरी १, अन्य १९७

ग्रामीण भागातील रुग्ण
वैजापूर १, बिडकीन १, कन्नड २, नाथविहार पैठण १, गंगापूर २, रांजणगाव २, खुलताबाद २, फुलंब्री १, वाळूज २, शेणपूजी, गंगापूर १, तालवाडी, वेरूळ १, सिडको महानगर एक येथे ४, बजाजनगर ९, म्हाडा कॉलनी, तिसगाव १, साऊथ सिटी २, लासूर स्टेशन १, सावंगी १, देवगाव रं १, अन्य ५३.

Web Title: Record break! An increase of 550 corona patients in Aurangabad district on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.