नारायण राणेंच्या विरोधात शिवसैनिकांचे जोडेमारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 11:58 AM2021-08-24T11:58:26+5:302021-08-24T12:01:41+5:30
Shiv Sena's agitation against Narayan Rane : शहरातील बीजेपी कार्यालासमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
औरंगाबाद : केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे ( Narayan Rane) यांचे मुख्यमंत्र्यांच्या ( CM Uddhav Thakarey ) संदर्भातील व्यक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. नारायण राणेंच्या विरोधात क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळी जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे (Ambadas Danave ) यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे. यानंतर शिवसैनिकांनी क्रांती चौकात नारायण राणेंच्या प्रतिमेला 'जोडोमारो' आंदोलन केले. ( Shiv Sena's 'Chappal Maro' agitation against Narayan Rane in Aurangabad )
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत सोमवारी आक्षेर्पाह वक्तव्य केले. त्या विरोधात शिवसेनेने मंगळवारी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात राणे विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर क्रांतिचौकात घोषणाबाजी करीत राणे यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले. कोंबडी चोर राणे अशा घोषणा देत हातात कोंबडी घेऊन हे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ.दानवे म्हणाले, राणे यांना शिवसेनेवर गरळ ओखण्याविना दुसरे काम नाही. त्यांना दुसरे काम नाही, म्हणून त्यांनी सगळे सोडून कोंबडी चोरण्याचा व्यवसाय करावा. त्यामुळे कोंबडी आम्ही आंदोलनातून उपल्बध करून देत आहोत. शिवसेना काय आहे हे राणे यांना माहिती आहे. बांद्रा, कणकवली येथे त्यांना पराभवाची धूळ चारली आहे, ती शिवसेनेने. मुख्यमंत्री बाबत बोलताना प्रोटोकॉल पाळला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे. राणे जशास तसे उत्तर देणार असे बोलत आहेत. त्यापूर्वी आम्हीच त्यांना उत्तर देऊ, असे दानवे यांनी स्पष्ट केले. या निषेध आंदोलनात माजी सभापती राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे आदींचा सहभाग होता. दरम्यान, शहरातील बीजेपी कार्यालासमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
कोणाची काय शैली आम्हाला माहिती नाही; राणेंनी गुन्हा केला, कारवाई होणारच