विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग प्रकरण; विद्यापीठाचे पीआरओ संजय शिंदे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 03:31 PM2021-09-20T15:31:49+5:302021-09-20T15:32:42+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university News : कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग प्रकरणात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपकुलसचिव गणेश मंझा यांनी दिली.
विद्यार्थिनीला व्हाट्सॲपवर आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याप्रकरणी त्यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विविध विद्यार्थी संघटनांनी त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला होता. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून विद्यापीठ प्रशासनाने शिंदे यांच्याकडून खुलासा मागवला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे मंझा म्हणाले. शनिवारी पुढील आदेशापर्यंत शिंदे यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर निलंबनाची ही दुसऱ्यांदा कारवाई झाली आहे.