वेळीच सावध व्हा ! कोरोना पॉझिटिव्ह दर वाढला; पुन्हा तिहेरी रुग्णसंख्येकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 06:35 PM2021-02-13T18:35:46+5:302021-02-13T18:37:42+5:30
Corona virus positive rate increased in Aurangabad नव्या वर्षात २६ जानेवारी रोजी केवळ २१ रुग्णांचे निदान झाले. पण या तारखेनंतर रोज निदान होणाऱ्या आणि सक्रीय रुग्णांची संख्या वाढत आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल ७ महिने कोरोनाचा अक्षरश: कहर पहायला मिळाला. पण ऑक्टोबरपासून कोरोनाला उतरती कळा लागली. रुग्णांचा आलेेख घसरला, मृत्यूचे प्रमाणही घटले. लसीकरणही सुरु झाले. नागरिकांच्या मनातील भिती दूर झाली. परिणामी, मास्कचा वापर, समाजिक अंतर, हाताच्या स्वच्छतेकडे नागरिकांकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून पुन्हा तिहेरी रुग्णसंख्येकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांतून व्यक्त होत आहे.
आरोग्य यंत्रणा सध्या लसीकरणात व्यस्त आहे. परिणाणी, रुग्ण कमी होण्यासाठी महत्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर विनामास्क नागरिक सर्रास वावरत आहेत. त्याकडेही यंत्रणा डोळेझाक करीत आहे. परिणामी, शहरातील प्रत्येक भागात कोरोनाचा पुन्हा प्रसार होताना पहायला मिळत आहे. शहरात मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले होते. जिल्ह्यात २७ एप्रिल २०२० रोजी पहिल्यांदा कोरोनाने दुहेरी संख्येत शिरकाव केला. यानंतर ८ मे पासून तब्बल ५ महिने रोज तिहेरी आकड्यात काेरोना रुग्णांचे निदान होत गेले. मात्र, ऑक्टोबरपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला आणि रोज निदान होणार्या रुग्णांची संख्या दुहेरी संख्येत आली. ३१ ऑक्टोबर रोजी तब्बल महिन्यांनंतर सर्वाधिक कमी ९८ रुग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर जानेवारी अखेरपर्यंत रोज निदान होणा-या आणि सक्रीय (रुग्णालयात दाखल) रुग्णांचा आलेख घसरत गेला. २७ एप्रिल रोजी पहिल्यांदा दुहेरी संख्येत म्हणजे २९ रुग्ण आढळले होते. त्यानंतर अनेक महिन्यांनंतर नव्या वर्षात २६ जानेवारी रोजी केवळ २१ रुग्णांचे निदान झाले. पण या तारखेनंतर रोज निदान होणाऱ्या आणि सक्रीय रुग्णांची संख्या वाढत आहे. दैनंदिन पाॅझिटिव्हीटी रेट एका दिवसात दुप्पट झाला.
सक्रीय रुग्ण कुठे, किती ?
ग्रामीण भागात-४५
शहरात-२१५
दैनंदिन पाॅझिटिव्हीटी रेट
९ जानेवारी-७.९४
८ जानेवारी-३.३९
असे कमी होत गेले नवे रुग्ण
१ जानेवारी-८२
२ जानेवारी-७६
४ जानेवारी-७१
८ जानेवारी -६६
१४ जानेवारी-४८
१५ जानेवारी-३६
२४ जानेवारी-२४
२६ जानेवारी-२१
असे वाढले पुन्हा नवे रुग्ण
२७ जानेवारी-३२
२८ जानेवारी-४४
४ फेब्रुवारी-४८
९ फेब्रुवारी-६८
११ फेब्रुवारी-६६
सक्रीय (रुग्णालयात दाखल )रुग्णांचा असा घसरला आलेख
१८ जानेवारी-२६०
२० जानेवारी-२४९
२२ जानेवारी-१८५
२४ जानेवारी-१४३
२५ जानेवारी-१२५
२६ जानेवारी-११५
२८ जानेवारी-९१
सक्रीय रुग्णांचा असा वाढला पुन्हा आलेख :
२९ जानेवारी -१०२
४ फेब्रुवारी-१३८
६ फेब्रुवार-१६२
८ फेब्रुवारी-१९५
९ फेब्रुवारी-२३४
१० फेब्रुवारी-२४५
११ फेब्रुवारी-२६०