या कंपनीने ३०० दिवसांत बनवल्या १ लाख इलेक्ट्रिक स्कूटर, गेल्या २ महिन्यापासून नॉनस्टॉप विक्री सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 04:41 PM2022-11-05T16:41:44+5:302022-11-05T16:42:04+5:30

देशात इलेक्ट्रिक स्कुटर वापरणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इंधनाच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांना पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांकडे पाहिले जात आहे.

1 lakh electric scooters made by ola company in 300 days non-stop sale since last 2 months | या कंपनीने ३०० दिवसांत बनवल्या १ लाख इलेक्ट्रिक स्कूटर, गेल्या २ महिन्यापासून नॉनस्टॉप विक्री सुरू

या कंपनीने ३०० दिवसांत बनवल्या १ लाख इलेक्ट्रिक स्कूटर, गेल्या २ महिन्यापासून नॉनस्टॉप विक्री सुरू

Next

देशात इलेक्ट्रिक स्कुटर वापरणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इंधनाच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांना पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांकडे पाहिले जात आहे. ओलाने गेल्या काही दिवसापासून इलेक्ट्रिक टु-व्हीलर गाड्यांचे उत्पादन सुरू केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या गाड्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कंपनीने ३०० दिवसात १ लाख टु-व्हीलर स्कुटर बनवल्या आहेत.

भयंकर! कार खरेदी करून मित्रांसोबत घरी परतत होता; गावच्या १ किमी आधीच झाला मृत्यू

ओला कंपनीने तामिळनाडूतील फ्युचर फॅक्टरीमधून एक लाखव्या स्कूटरचे उत्पादन केले. कंपनीने नोव्हेंबर २०२१ मध्ये या फॅक्टरीमध्ये उत्पादन सुरू केले. हा टप्पा गाठण्यासाठी १० महिने लागले आहेत. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

ओला इलेक्ट्रिकचा दावा आहे की भारतातील कोणत्याही ईव्ही उत्पादकासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी विक्री आहे. आता प्रीमियम EV विभागामध्ये जवळपास ५०% मार्केट शेअर आहे. या विभागात अथर एनर्जी, बजाज चेतक तसेच Hero MotoCorp Vida यांचा समावेश आहे. ओलाने नुकतेच त्ंयाचे सर्वात परवडणारे मॉडेल ओला A1 एअर लाँच केले. याची किंमत ८४,९९९ रुपये आहे. या मॉडेलमध्ये फीचर्स कमी करण्यात आले आहेत. या किंमतीत, A1 कंपनीच्या स्वतःच्या S1 मॉडेलला मागे टाकू शकते. त्याची बुकिंग फेब्रुवारी २०२३ मध्ये सुरू होईल. एप्रिलमध्ये डिलिव्हरी सुरू होऊ शकते.

सप्टेंबरमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या ५२,९५७ युनिट्सची विक्री झाली. तर ऑगस्टमध्ये हा आकडा ५०,४७४ युनिट होता. म्हणजेच इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये दर महिन्याला वाढ दिसून येते. सप्टेंबर २०२२ मध्ये, ओला इलेक्ट्रिकने ९,६१६ इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या. नवरात्री-दसरा ऑफरमुळे कंपनी आपल्या ई-स्कूटरवर १० हजार रुपयांची सूट देण्यात आली होती. Ola इलेक्ट्रिकला ऑक्टोबरमध्येही फेस्टिव्हल ऑफरचा फायदा झाला

Web Title: 1 lakh electric scooters made by ola company in 300 days non-stop sale since last 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.