Ather EV Scooter: एथर जोमात! मुंबईत उभारली १० चार्जिंग स्टेशन, कारही चार्ज करा; पहा लोकेशन...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 01:03 PM2021-04-27T13:03:06+5:302021-04-27T13:14:22+5:30
Ather EV Scooter charging locations in Mumbai: पुढील वर्षीपर्यंत एथर एनर्जी कडून मुंबईतील विविध ठिकाणी ३० फास्ट चार्जिंग पॉईंट्स सुरु करण्यात येणार आहेत. या करता एथर एनर्जी ने पार्क + बरोबर भागीदारी केली असून त्यांच्या कडून मुंबईत इव्ही लोकेशन्स सुरु करण्यात येणार आहेत.
मुंबई : एथर एक्सपिरियन्स सेंटर आणि एथर ४५० एक्सच्या (Ather 450X) मुंबईतील डिलिव्हरीज सुरू केल्यानंतर आता एथर एनर्जी कडून मुंबईत फास्ट चार्जिंग पब्लिक नेटवर्क उभारण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत मुंबईतील १० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. (Ather started delevery of 450X electric scooter in Mumbai, also started fast-charging public network on 10 locations.)
पुढील वर्षीपर्यंत एथर एनर्जी कडून मुंबईतील विविध ठिकाणी ३० फास्ट चार्जिंग पॉईंट्स सुरु करण्यात येणार आहेत. या करता एथर एनर्जी ने पार्क + बरोबर भागीदारी केली असून त्यांच्या कडून मुंबईत इव्ही लोकेशन्स सुरु करण्यात येणार आहेत. पार्क + हा स्मार्ट पार्किंग सोल्युशन्स प्रदाता ब्रॅन्ड असून यामध्ये वापरकर्त्यांना पार्किंग शोधणे, स्लॉट बुक करणे आणि डिजिटली पैसे देणे अशा सुविधा प्रदान करतो. एथर एनर्जी कडून सातत्याने अधिक प्रगतीशील अशा कंपन्यांबरोबर करार केले जाणार असून यामुळे ईव्ही मालकांना सोप्या पध्दतीने, रेंजचा त्रास कमी करत ईव्ही वापरणे शक्य होणार आहे. एथर एनर्जी कडून सहकारी गृहनिर्माण संस्था आणि ओनर्स असोसिएशन्स बरोबरही सहकार्य करार केले जाणार असून त्याअंतर्गत एथरचे मालक हे त्यांच्या बिल्डिंग आणि अपार्टमेंट्ससाठी होम चार्जिंग सुविधा सुरू करु शकणार आहेत.
एथर एनर्जीकडून भारतातील १८ शहरांमध्ये १२८ पब्लिक चार्जिंग पॉईंट्सची सुरुवात केली आहे. फास्टचार्जिंग नेटवर्क चा उपयोग हा भारतातील सर्व इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी मालकांकडून केला जाऊ शकतो आणि त्याच बरोबर या सुविधांचा वापर ते सप्टेंबर २०२१ पर्यंत अगदी मोफत करू शकतील. या चार्जिंग नेटवर्क वर नियंत्रण हे एथर ग्रीड अॅपच्या माध्यमातून करण्यात येणार असून यामुळे ईव्ही चे मालक हे लगेच रिअल टाईम तत्वावर जवळचे चार्जिंग स्टेशन शोधणे व त्याची उपलब्धता तपासता येते. ए एनर्जी ने आपल्या वाढीचे लक्ष्य समोर ठेवत ज्या २७ बाजारपेठेत एथर तर्फे २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत डिलिव्ही सुरू करण्यापूर्वी ५-६ पॉईंट्स सुरू करण्याची योजना आखली आहे.
कुठे कुठे आहेत चार्जिंग स्टेशन
- रूणवाल अॅथेरियम, मुलुंड पश्चिम
- सुवा इंटरनॅशनल, अंधेरी पूर्व
- क्लब क्वेरिया, बोरिवली
- सेलेस्टिया स्पेसेस, शिवडी
- ब्ल्यू टोकाई, महालक्ष्मी
- काळा घोडा कॅफे, फोर्ट
- एथर स्पेस मुंबई, लिकिंग रोड
- के स्टार मॉल, चेंबूर
- कार्निव्हल सिनेमा आयमॅक्स, वडाळा
- लोढा फ्लोरेंझा, गोरेगाव