10 लाखांपेक्षा स्वस्तात कार घ्यायची असेल तर 'वेट अँड वॉच'; मार्केटमध्ये येणार 5 धमाकेदार गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 03:06 PM2023-06-04T15:06:45+5:302023-06-04T15:07:16+5:30

तुम्हीही 10 लाख रुपयांच्या सेगमेंटमध्ये स्वत:साठी उत्तम कार शोधत असाल, तर आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल

10 upcoming cars under 10 lakh to launch in india | 10 लाखांपेक्षा स्वस्तात कार घ्यायची असेल तर 'वेट अँड वॉच'; मार्केटमध्ये येणार 5 धमाकेदार गाड्या

10 लाखांपेक्षा स्वस्तात कार घ्यायची असेल तर 'वेट अँड वॉच'; मार्केटमध्ये येणार 5 धमाकेदार गाड्या

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतात स्वस्त वाहनांना नेहमीच मागणी असते आणि आताही ग्राहक अशा वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तुम्हीही 10 लाख रुपयांच्या सेगमेंटमध्ये स्वत:साठी उत्तम कार शोधत असाल, तर आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. कारण लवकरच पाच धमाकेदार कार बाजारात दाखल होणार आहेत. 

1. Hyundai Exter
ह्युंडाई भारतात आपली पहिली मायक्रो एसयूव्ही लाँच करणार आहे. कंपनी कारचे डिझाइन आणि फीचर्स एकामागून एक समोर आणत आहे. कारची डिझाइन अतिशय आकर्षक असून येत्या 10 जुलै रोजी बाजारात दाखल होणार आहे. ही SUV सध्या 11,000 रुपयांमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. ही SUV एकूण 5 ट्रिम्स EX, S, SX, SX(O) आणि SX(O) कनेक्टमध्ये उपलब्ध असणार आहे. कार पेट्रोल आणि सीएनजी इंधन पर्यायांसह 1.2-लिटर कप्पा इंजिन बसवण्यात आले आहे. या कारची सुरुवातीची किंमत 10 लाख रुपये असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

2. Tata Nexon Facelift
नेक्सॉन फेसलिफ्ट ऑगस्ट 2023 च्या आसपास येण्याची शक्यता आहे. कारची सुरुवातीची किंमत 8 लाख रुपये असणार आहे. नेक्सॉन एसयूव्हीचे हे दुसरे फेसलिफ्ट मॉडेल असणार आहे. अपडेटेड मॉडेलमध्ये कारच्या डिझाईनमध्ये मोठा बदल होणार आहे. इंटिरिअरला 10.25-इंच इंफोटेनमेंट सिस्टीम, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 2 स्पोक स्टीयरिंग व्हीलसह पूर्णपणे नवीन लेआउट मिळेल. या व्यतिरिक्त अपडेटेड SUV ला नवीन 1.2-लीटर tGDi पेट्रोल इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे, जे 125 bhp आणि 225 Nm पीक टॉर्क निर्माण करेल.

3. Tata Punch CNG
टाटा मोटर्सने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत Altroz ​​CNG लाँच केले. यानंतर येत्या काही महिन्यांत पंच सीएनजी सुरू होणार आहे. यात ड्युअल-सिलिंडर टेक्नॉलॉजी असणार आहे. यामध्ये बूट फ्लोअरच्या खाली 30-लिटरच्या दोन टाक्या असतील. कारमध्ये 1.2  लीटर  3-सिलिंडर पेट्रोल इंजिन दिले जाईल, जे 77 Bhp आणि 97 Nm पीक टॉर्क निर्माण करेल. ज्यामुळे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जाईल.

4. Kia Sonet Facelift
सोनेट फेसलिफ्टची नुकतीच विदेशात चाचणी करण्यात आली. दरम्यान, ही कार 2024 च्या सुरुवातीला भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. सोनेट सेगमेंटमध्ये टेक-लोडेड ऑफर असू शकते. तसेच, अपडेट केलेल्या मॉडेलमध्ये काही नवीन फीचर्स असण्याची शक्यता आहे. या कारमध्ये 1.2-लीटर NA पेट्रोल, 1.5-लीटर CRDi डिझेल आणि 1.0-लीटर tGDi पेट्रोल इंजिन असेल.

5. New-Gen Honda Amaze
होंडाची लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडानला लवकरच नवीन जनरेशनचे मॉडेल मिळणार आहे. हे 2024 मध्ये लॉन्च केले जाईल. सेडानमध्ये 1.2-लिटर i-VTEC इंजिन दिले जाईल, जे 90 bhp आणि 110 Nm पीक टॉर्क निर्माण करते. या कारची डिझाईन लँग्वेजही बदलली जाणार असून त्यात एडीएएस फीचरही दिले जाऊ शकते.

Web Title: 10 upcoming cars under 10 lakh to launch in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.