100 KMची रेंज अन् जबरदस्त फीचर्स; फक्त 55 हजारात लॉन्च झाली 'ही' Electronic Scooter...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 05:33 PM2022-11-30T17:33:51+5:302022-11-30T17:35:13+5:30
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. यामुळेच मार्केटमध्ये नवनवीन कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने आणत आहे.
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. यामुळेच मार्केटमध्ये नवनवीन कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने आणत आहे. यातच डेल्टिक इलेक्ट्रिक(Deltic Electric)ही त्यांची नवनवीन वाहने बाजारात आणत आहे. सध्या कंपनीने अतिशय कमी किमतीतील इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे.
आकर्षक डिझाइन आणि पॉवरफूल बॅटरी
Deltic कंपनीने त्यांच्या Drixx Electric Scooterला आकर्षक डिझाइनसह बनवले आहे. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक स्कूटर चांगल्या रेंजसह जास्त वजनही वाहून नेऊ शकते. Deltic Drixx इलेक्ट्रिक स्कूटर 60V, 35Ah पॉवरफुल बॅटरीसह येते, जी स्कूटरला एका चार्जवर 100 किलोमीटरपर्यंतची रेंज देते.
कमी किमतीत जास्त फायदे
विशेष म्हणजे, कंपनीने या Deltic Drixx इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत फक्त 55,000 रुपये ठेवली आहे. विविध मॉडेलनुसार किंमत कमी-जास्त होऊ शकते. या स्कूटरची रेंज 100 किलोमीटर आहे. स्कूटरची लिथियम आयन बॅटरी चार्ज करण्यासाठी पॉवरफुल चार्जिंग अडॅप्टर देण्यात आले आहे. याच्या मदतीने तुम्ही या स्कूटरची बॅटरी फक्त 3 ते 4 तासांत चार्ज करू शकता.