जगातील सर्वात मोठी कंपनी टोयोटाचे 14 पैकी 12 प्लांट अचानक बंद; जपानमध्ये कंपनीत उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 10:52 AM2023-08-30T10:52:46+5:302023-08-30T11:03:30+5:30

उत्पादन पुन्हा कधी सुरू होईल हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. परदेशातील कारखान्यांवरही परिणाम झाला की नाही हे देखील कंपनीने सांगितलेले नाहीय.

12 out of 14 plants of Toyota work stopped in japan; fear of cyber attack again | जगातील सर्वात मोठी कंपनी टोयोटाचे 14 पैकी 12 प्लांट अचानक बंद; जपानमध्ये कंपनीत उडाली खळबळ

जगातील सर्वात मोठी कंपनी टोयोटाचे 14 पैकी 12 प्लांट अचानक बंद; जपानमध्ये कंपनीत उडाली खळबळ

googlenewsNext

जगातील सर्वात मोठ्या वाहन निर्माता कंपनीत मंगळवारी खळबळ उडाली होती. कंपनीने जपानमधील १४ पैकी १२ प्रकल्प अचानक बंद केले आहेत. सायबर हल्ला झाल्याने हे करावे लागल्याची शक्यता आहे. 

टोयोटाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात कंपनीच्या सिस्टिममध्ये समस्या आल्याने जपानमध्ये १४ पैकी १२ फॅक्टरींमधील काम रोखण्यात आले आहे. हा सायबर हल्ला असेल असे आम्हाला वाटत नाही, असे म्हटले आहे. 

12 फॅक्टरींमधील २५ लाईनवर परिणाम झाला आहे. सिस्टिममध्ये समस्या आल्याने पार्ट्सची ऑर्डर पुरविणे अशक्य झाले आहे. सध्यातही हा सायबर हल्ला नाही, असे वाटतेय. परंतू, या प्रकरणाची आम्ही चौकशी करु आणि लवकरच काम सुरळीत सुरु करू, असे टोयोटाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. 

उत्पादन पुन्हा कधी सुरू होईल हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. परदेशातील कारखान्यांवरही परिणाम झाला की नाही हे देखील कंपनीने सांगितलेले नाहीय. दक्षिणेकडील क्युशू प्रदेशातील टोयोटा फॅक्टरी आणि क्योटो येथील उपकंपनी दैहत्सूचा फॅक्टरी कार्यरत आहे, असे प्रवक्त्याने सांगितले. 

या बातमीनंतर टोयोटाचा शेअर घसरला होता. 0.64 टक्क्यांनी घसरून 2,421.0 येन वर आला होता. यामुळे टोकियो मार्केटमधील दुपारच्या ब्रेकच्या आधी अचानक विक्रीचा वेग कमी झाल्याचे दिसत होते. गेल्या वर्षीही टोयोटाच्या एका सहाय्यक कंपनीवर सायबर हल्ला झाला होता. यामुळे सर्व कारखाने बंद ठेवावे लागले होते. 

Web Title: 12 out of 14 plants of Toyota work stopped in japan; fear of cyber attack again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Toyotaटोयोटा