... तर भरावा लागणार १२,५०० रुपयांचा दंड; वाहन चालवण्यापूर्वी पाहा नियम आणि करू नका चूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 10:51 PM2022-04-14T22:51:45+5:302022-04-14T22:52:11+5:30
जर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानंतर ट्रॅफिक पोलीस तुमच्यावर कठोर कारवाई करू शकतात.
जर वाहतुकीचे नियम मोडले तर तुम्हाला 12500 रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. जर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानंतर ट्रॅफिक पोलीस तुमच्यावर कठोर कारवाई करू शकतात. मोटर व्हेइकल कायद्याच्या कलम 194C नुसार जर तुम्ही दुचाकीवरून तीन जण प्रवास करत असाल तर तुम्हाला 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. याशिवाय आपात्कालिन वाहनाला रस्ता न दिल्यास 193E नुसार 10 हजार रुपयांचा दंड, तर सूर्यास्तानंतर अंधारात गाडीचा लाईट सुरू न ठेवता वाहता चालवल्यास CMVR 105/177 MVA नुसार 1500 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
याशिवाय नुकतेच वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत 20 हजार रुपयांचे वाहतूक चालान कापले आहे. अलीकडेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून गाडीच्या छतावर उभ्या असलेल्या काही तरुणांचा नाचण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओची दखल घेत गाझियाबाद पोलिसांनी एकूण 20 हजार रुपयांचे चालान करून 5 तरुणांना अटक केली होती. गाझियाबाद पोलिसांनीच ही माहिती दिली होती.
कशी पाहाल चालानबाबत माहिती?
https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. चेक चलन स्टेटस हा पर्याय निवडा. तुम्हाला चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) चा पर्याय मिळेल. वाहन क्रमांकाचा पर्याय निवडा. विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि 'Get Detail' वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या गाडीवर कोणतं चालान आहे का नाही याची माहिती मिळेल.
कसं भराल ऑनलाइन?
https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. चालानशी संबंधित आवश्यक तपशील आणि कॅप्चा भरा. त्यानंतर गेट डिटेल्सवर क्लिक करा. एक नवीन पान उघडेल. त्यावर चालानचे तपशील दिले जातील. तुम्हाला भरायचे असलेले चालान शोधा. चालानासोबतच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पेमेंट संबंधित माहिती भरा. पेमेंटची कन्फर्म करा. त्यानंतर तुमचं चालान भरलं जाईल.