भारतात २० ऑटो कंपन्या, कित्येकांचे तर नावालाच अस्तित्व...; जूनमध्ये कोणी किती कार विकल्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 01:13 PM2024-07-06T13:13:02+5:302024-07-06T13:13:23+5:30

Car Sale in June: गेला जून महिना हा ऑफर्सचा महिना होता. कोणी २० हजार कोणी दीड लाखापर्यंतचा डिस्काऊंट आपल्या कारवर दिला होता.

20 auto companies in India, many exist in name only...; How many cars did anyone sell in June? | भारतात २० ऑटो कंपन्या, कित्येकांचे तर नावालाच अस्तित्व...; जूनमध्ये कोणी किती कार विकल्या?

भारतात २० ऑटो कंपन्या, कित्येकांचे तर नावालाच अस्तित्व...; जूनमध्ये कोणी किती कार विकल्या?

गेला जून महिना हा ऑफर्सचा महिना होता. कोणी २० हजार कोणी दीड लाखापर्यंतचा डिस्काऊंट आपल्या कारवर दिला होता. या महिन्यात २.८१ लाख एवढ्या कार विकल्या गेल्या आहेत. अर्थातच मारुती टॉपवर असली तरी भारतात २० कंपन्या आपल्या कार विकतात. यामध्ये ह्युंदाई, टाटा, महिंद्रा, टोयोटा, स्कोडा, फोक्सवॅगन, होंडा सारख्या कंपन्या येतात. या कंपन्यांनी डिस्काऊंट देऊनही किती कार विकल्या याचा आकडा आला आहे. 

मारुतीने 1,13,575 युनिट एवढ्या कार विकल्या. ह्युंदाईने 38,046 युनिट एवढ्या कार विकल्या. टाटा आणि ह्युंदाईमध्ये जोरदार टफफाईट सुरु आहे. टाटाने 37,242 कार विकल्या आहेत. महिंद्राने 34,958 एसयुव्ही विकल्या आहेत. टोयोटाने 18,297 कार विकल्या आहेत. किया मोटर्सने 16,158 कार विकल्या आहेत. 

स्कोडा आणि फोक्सवॅगन ग्रुपला भारतात भागीदार हवा आहे. २० वर्षे आणि २ अब्ज डॉलर्स ओतूनही या कंपन्यांना भारतात म्हणावा तसा परतावा मिळत नाहीय. या कंपन्यांनी जूनमध्ये 5,418 कार विकल्या आहेत. याच ऑडीने ४३ कार विकल्या आहेत. 

होंडाने 4,178 कार विकल्या आहेत. एमजी मोटर्सने 3,675 कार विकल्या आहेत. रेऩॉने 2,961 कार विकल्या आहेत. निस्सानने 1,559 कार विकल्या आहेत. मर्सिडीजने 1,149 कार विकल्या आहेत. बीएमडब्ल्यूने 968 कार विकल्या आहेत. फोर्स मोटर्सने 659 कार विकल्या आहेत. पीसीए ऑटोमोबाइल्सने म्हणजेच सिट्रॉएनने 515 कार विकल्या आहेत. जग्वार लँडरोव्हरने 295 कार विकल्या आहेत. फियाटने 285 कार विकल्या आहेत. बीवायडीने 229 कार विकल्या आहेत. व्होल्वोने 137 कार विकल्या आहेत. या व्यतिरिक्त इतर कंपन्यांनी 1,262 कार विकल्या आहेत. 

Web Title: 20 auto companies in India, many exist in name only...; How many cars did anyone sell in June?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार