Aston Martin ने लॉन्च केली नवीन स्पोर्ट कार, जाणून घ्या किंमत आणि खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 01:06 PM2018-09-26T13:06:04+5:302018-09-26T13:08:31+5:30

ब्रिटिश कार निर्माता कंपनी  Aston Martin ने भारतात आपली नवीन आलिशान Vantage स्पोर्ट कार लॉन्च केली आहे.

2019 Aston Martin Vantage sports car launched in India | Aston Martin ने लॉन्च केली नवीन स्पोर्ट कार, जाणून घ्या किंमत आणि खासियत

Aston Martin ने लॉन्च केली नवीन स्पोर्ट कार, जाणून घ्या किंमत आणि खासियत

googlenewsNext

नवी दिल्ली : ब्रिटिश कार निर्माता कंपनी  Aston Martin ने भारतात आपली नवीन आलिशान Vantage स्पोर्ट कार लॉन्च केली आहे. कंपनीने या 2019 Aston Martin Vantage कारची किंमत २.९५ कोटी रुपये(एक्स शोरुम, मुंबई) इतकी ठेवली आहे. 2019  व्हिंटेज स्पोर्ट कारचं एस्टन मार्टिन ही सर्वात स्वस्त कार आहे. असे मानले जात आहे की, ही कार भारतात Mercedes-AMG GT, Audi R8 V10 आणि Porsche 911 Turbo यांसारख्या कार्सशी स्पर्धा करणार आहे. 

2019 एस्टन मार्टिन व्हिंटेज कारचं वजन 1,530 किलोग्रॅम आहे. या कारमध्ये Mercedes- AMG-sourced 4.0-लिटर, ट्विन-टर्बो V8 इंजिन दिलं गेलं आहे. तर या इंजिनला 8 स्पीड जेडएफ ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हे दमदार इंजिन 510PS ची पॉवर आणि 685Nm चा टॉर्क जनरेट करतं. कंपनीचा दावा आहे की, ही स्पोर्ट कार 3.6 सेंकदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावू शकते. या कारची हायस्पीड ३१३ किलोमीटर प्रति तास आहे. 

या कारच्या लूकबाबत सांगायचं तर या स्पोर्ट कारचं डिझाइन कंपनीच्या Vulcan सुपरकार आणि DB11मॉडलपासून घेण्यात आलं आहे. त्यामुळेही कार आणखीन आकर्षक आणि आलिशान दिसते. 2019 व्हिंटेज स्पोर्ट कारमध्ये 122mm ग्राऊंड क्लिअरंस दिला गेला आहे. जेणेकरुन कारचा खालचा भाग सुरक्षित रहावा. 

कारचं इंटेरिअरही फार लक्झुरिअस करण्यात आलं आहे. भारतात सध्या या कारचे केवळ २० यूनिट अलॉट केले आहेत. या कारसाठी कंपनीने बुकिंग सुरु केली आहे. भारतात एस्टन मार्टिनच्या या नव्या कारची डिलेवरी 2019 च्या सुरुवातीला केली जाणार आहे. 
 

Web Title: 2019 Aston Martin Vantage sports car launched in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.