2021 Honda Amaze Facelift : होंडाची Amaze फेसलिफ्ट लाँच; मारुती डिझायरला टक्कर देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 01:29 PM2021-08-18T13:29:15+5:302021-08-18T13:31:21+5:30

2021 Honda Amaze facelift launched in India:  2021 Honda Amaze तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही कार पहिल्यांदा कार घेणाऱ्या ग्राहक वर्गाकडे पाहून बनविण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.

2021 Honda Amaze facelift has been launched in India at ₹6.32 lakh | 2021 Honda Amaze Facelift : होंडाची Amaze फेसलिफ्ट लाँच; मारुती डिझायरला टक्कर देणार

2021 Honda Amaze Facelift : होंडाची Amaze फेसलिफ्ट लाँच; मारुती डिझायरला टक्कर देणार

Next

होंडाने भारतात 2021 Amaze फेसलिफ्ट लाँच केले आहे. या कॉम्पॅक्ट सेदानची सुरुवातीची किंमत 6.32 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. टॉप मॉडेलची किंमत 11.5 लाखांवर जाते. एक्सटिरिअरमध्ये मोठे बदल असले तरी देखील इंटिरिअरमध्ये फार कमी बदल करण्यात आले आहेत. यामुळे तुम्हाला ही कार आतून जुन्या मॉडेलसारखीच वाटणार आहे. 

2021 Honda Amaze तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही कार पहिल्यांदा कार घेणाऱ्या ग्राहक वर्गाकडे पाहून बनविण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. यामध्ये E, S, VX व्हेरिअंट आहेत. पेट्रोलमध्ये S, VX व्हेरिअंटमध्ये सीव्हीटी ऑटोमॅटीक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. डिझेलमध्ये फक्त VX मध्येच CVT  गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 

नव्या अमेझमध्ये 1.2-लीटर i-VTEC पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 89 bhp ताकद आणि 110 Nm चा टॉर्क प्रदान करते. तर .5-लीटर i-DTEC डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 99 bhp ताकद आणि 200 Nm टॉर्क प्रदान करते. 
2021 Honda Amaze फेसलिफ्टमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलँप, रिवाईज्ड फ्रंट बंपर, ट्वीड फ्रंट ग्रील, क्रोम सराउंडसोबत फॉग लाईट मिळते. नवीन ड्युअल टोन अलॉय व्हील, क्रोम इन्सर्टसोबत रिअर बंपर आणि सी शेप्ड एलईडी टेल लाईट देण्यात आली आहे. 

आतमध्ये काय बदल...
होंडा अमेझमध्ये रिअर व्ह्यू कॅमेरा आहे, डॅशबोर्ड आणि डोअर पॅडसाठी तीन वेगवेगळे व्यू मिळतात. पॅडल शिफ्टर्स, अँड्रॉईड ऑटो, अॅपल कारप्ले आणि इंजिन स्टार्ट, स्टॉप बटन आहे. 

Web Title: 2021 Honda Amaze facelift has been launched in India at ₹6.32 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.