2021 Jaguar F-Pace भारतात लाँच; किंमत 69.99 लाख रूपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 01:32 PM2021-06-11T13:32:01+5:302021-06-11T13:32:15+5:30

Jaguar F-Pace: नवीन एक्‍स्‍टीरिअर डिझाइन पुरस्‍कार-प्राप्‍त जग्‍वार एफ-पेसला अधिक आकर्षक व अधिक खात्रीदायी लुक देते, ज्‍यामध्‍ये नवीन कोरीव काम केलेल्या बोनेटसह व्‍यापक पॉवर बल्‍ज आहे.

2021 Jaguar F-Pace launched in India; Price Rs 69.99 lakh | 2021 Jaguar F-Pace भारतात लाँच; किंमत 69.99 लाख रूपये 

2021 Jaguar F-Pace भारतात लाँच; किंमत 69.99 लाख रूपये 

googlenewsNext

मुंबई : जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने आज भारतामध्‍ये नवीन जग्‍वार एफ-पेसच्‍या डिलिव्‍हरीजना सुरूवात झाल्‍याची घोषणा केली आहे. नवीन एफ-पेस पहिल्‍यांदाच इंजेनियम २.० लिटर पेट्रोल व डिझेल पॉवरट्रेन्‍समधील आर-डायनॅमिक एस ट्रिममध्‍ये उपलब्‍ध आहे. २.० लिटर पेट्रोल इंजिन १८४ Kw शक्‍ती व ३६५ एनएम टॉर्क देते आणि २.० लिटर डिझेल इंजिन १५० KW शक्‍ती व ४३० एनएम टॉर्क देते. नवीन जग्‍वार एफ-पेसची किंमत भारतामध्‍ये एक्‍स-शोरूम ६९.९९ लाख रूपये आहे. 


नवीन एक्‍स्‍टीरिअर डिझाइन पुरस्‍कार-प्राप्‍त जग्‍वार एफ-पेसला अधिक आकर्षक व अधिक खात्रीदायी लुक देते, ज्‍यामध्‍ये नवीन कोरीव काम केलेल्या बोनेटसह व्‍यापक पॉवर बल्‍ज आहे. सुधारित ग्रिलमध्‍ये जग्‍वारच्या वारसायुक्‍त लोगोमधून प्रेरित 'डायमंड' रचना आहे, तर बाजूच्‍या फेण्‍डर वेण्‍ट्समध्‍ये प्रतिष्ठित लीप एम्‍ब्‍लेम आहे. नवीन फ्रण्‍ट बंपरसह रिडिझाइन केलेले एअर इनटेक्‍स व डार्क मेश नवीन एफ-पेसच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करतात, ज्‍यामधून अधिक डायनॅमिक लुकची खात्री मिळते. नवीन सुपर स्लिम ऑल-एलईडी क्‍वॉड हेडलाइट्ससह 'डबल जे' डेटाइम रनिंग लाइट (डीआरएल) सिग्‍नेचर्स अधिक रिझॉल्‍युशन व ब्राइटनेस देतात. मागील बाजूस नवीन स्लिमलाइन लाइट्समध्‍ये जग्‍वारचे दुप्‍पट आकर्षक ग्राफिक आहे, जे पहिल्‍यांदा ऑल-इलेक्ट्रिक आय-पेसमध्‍ये दिसण्‍यात आले होते आणि ते वेईकलच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करते. नवीन बंपर डिझाइन आणि नवीन टेलगेट व्हिज्‍युअलमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करण्‍यासोबत अधिक आकर्षक लुकची खात्री देतात.


एफ-पेसमध्‍ये नवीन इंटीरिअरसह उच्‍चस्‍तरीय लक्‍झरी, सुधारित कनेक्‍टीव्‍हीटी आणि उच्‍च सुधारित घटक आहेत. अद्वितीय स्‍पोर्टी व लक्‍झरीअस लुकसाठी मार्स रेड व सिएना टॅन हे दोन नवीन आकर्षक रंग सादर करण्‍यात आले आहेत. नवीन कॉकपीट डिझाइन आकर्षक, अधिक डायनॅमिक असून ड्रायव्‍हरला उत्तम सुविधा देते. नवीन सेंटर कन्‍सोल इन्‍स्‍ट्रूमेंट पॅनलपर्यंत वाढवण्‍यात आले आहे आणि यामध्‍ये वायरलेस डिवाईस चार्जिंग वैशिष्‍ट्य आहे. अपर डोअर इन्‍सर्ट व अत्‍यंत रूंद 'पियानो लिड' अशा आकारांमध्‍ये सुरेखरित्‍या तयार करण्‍यात आलेले अस्‍सल अॅल्‍युमिनिअम फिनिशर इन्‍स्‍ट्रूमेट पॅनेलमध्‍ये भर करण्‍यात आले आहे. 


नवीन जग्‍वार एफ-पेसमध्‍ये नवीन तंत्रज्ञानांची श्रेणी आहे, ज्‍यामधून वेईकल नेहमीच कनेक्‍टेड व अद्ययावत राहण्‍याची खात्री मिळते. नवीन २८.९५ सेमी (११.४ इंच) वक्राकार ग्‍लास असलेल्‍या एचडी टचस्क्रीनमध्‍ये आधुनिक पिवी प्रो इन्‍फोटेन्‍मेंट तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचे प्रमुख लाभ म्‍हणजे सुधारित सुस्‍पष्‍टता व सुलभ मेनू स्‍ट्रक्‍चर, ज्‍यामुळे ग्राहकांना दोन किंवा कमी टॅप्‍समध्‍ये होम-स्क्रिनवरून ९० टक्‍क्‍यांपर्यंत टास्‍क्‍स पाहता येतात. केबिन एअर आयोनायझेशन नॅनो तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून वेईकलच्‍या आतील हवेचा दर्जा सुधारते. हे तंत्रज्ञान अ‍ॅलर्जिन्‍स आणि दुर्गंधींना दूर करते. या सिस्टिममध्‍ये आता पीएम२.५ फिल्‍ट्रेशन देखील आहे, जे अतिसूक्ष्‍म कणांसह पीएम२.५ कणांना दूर करत प्रवाशांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍य उत्तम राहण्‍याची खात्री देते. 


जग्‍वारच्‍या भारतातील रेंजमध्‍ये एक्‍सई (XE) (किंमत ४६.६४ लाख रूपयांपासून), एक्‍सएफ (XF) (५५.६७ लाख रूपयांपासून), आय-पेस (I-PACE) (किंमत १०५.९ लाख रूपयांपासून) आणि एफ-टाइप (F-TYPE) (किंमत ९७.९७ लाख रूपयांपासून) या कार्सचा समावेश आहे. उल्‍लेख करण्‍यात आलेल्‍या सर्व किंमती या भारतातील एक्‍स-शोरूम किंमती आहेत. 

Web Title: 2021 Jaguar F-Pace launched in India; Price Rs 69.99 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.